मुंबई : (ST Corporation) राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST Corporation) सवलतीसह प्रवासासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) अनिवार्य करण्यात आले असून आगामी काळात कार्डशिवाय ‘लालपरी’चा सवलतीचा प्रवास कठीण होणार आहे. हेच ओळखून आता सवलतधारकांनी या कार्डासाठी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरातून सर्वच आगारात आता या नोंदणीला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून गुरुवार,दि.२६ पर्यंत ६० हजार सवलतधारकांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे.(ST Corporation)
एसटी महामंडळाकडून (ST Corporation) मिळालेल्या माहितीनुसार, विविध सवलतधारक प्रवाशांपैकी एकूण ६०,००० प्रवाशांनी स्मार्ट कार्डासाठी नोंदणी पूर्ण केली आहे. अल्पावधीत झालेली ही नोंदणी कार्डची योजना लोकप्रिय ठरत असल्याचे संकेत देत आहे. अर्ज केल्यानंतर साधारणतः २० दिवसांत कार्ड तयार होऊन छपाई पूर्ण होते आणि बँकेमार्फत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते. कोणत्याही तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणास्तव विलंब झाल्यास जास्तीत जास्त ३० दिवसांचा कालावधी लागू शकतो.(ST Corporation)
कार्डमधील प्रथम टॉप-अप रक्कम कायम राहणार
या कार्डसाठी प्रथम ‘टॉप-अप’ रक्कम १०० रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, ज्येष्ठ्य नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ मिळत असल्यामुळे ही १०० रुपयांची रक्कम कार्डमध्ये कायम राहणार आहे. त्यामुळे लाभार्थींना अतिरिक्त आर्थिक भार पडणार नसून, ही रक्कम भविष्यातील इतर सेवांसाठी वापरता येऊ शकते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एनसीएमसी कार्ड हे जवळच्या बस डेपोमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.(ST Corporation)
योजनेअंतर्गत सुलभ नोंदणी प्रक्रिया, निश्चित कालावधीत कार्ड वितरण आणि किमान प्रारंभिक रक्कम यामुळे सवलतधारकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सवलत धारक प्रवाशांसाठी सुरु केलेल्या स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांना १९९रुपये इतकी मोठी रक्कम मोजावी लागत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सुरही आहे. प्रशासनाकडून येत्या काही दिवसांत आणखी नोंदणी केंद्रे सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी ही योजना महत्त्वाची पायरी ठरत असून, पुढील काही आठवड्यांत नोंदणीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.(ST Corporation)
एनसीएमसी कार्ड कोणासाठी आवश्यक?
एसटी महामंडळाने (ST Corporation) राज्यातील सवलत धारक प्रवाशांसाठी बुधवार,दि.११ फेब्रुवारी पासून स्मार्ट कार्ड प्रणाली जाहीर केली. विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरीक असे ३१ घटकांना एसटी प्रवासात सवलत दिली जाते. या प्रवाशांना एसटी नॅशनल काॅमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) काढणे बंधनकारक करण्यात येत आहे.(ST Corporation)
अद्याप कार्डची सक्ती नाही
एनसीएमसी स्मार्ट कार्डची नोंदणी सर्व आगारांमध्ये सुरू झाली असली तरी एसटी प्रवासासाठी त्याची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही. सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.(ST Corporation)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.