Statue of Swatantryaveer Savarkar : डोंगरी कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे भावपूर्ण अनावरण

    26-Feb-2026   
Total Views |
Statue of Swatantryaveer Savarkar
 
मुंबई : (Statue of Swatantryaveer Savarkar) सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त दि. २६ फेब्रुवारी रोजी डोंगरी येथील कारागृहात सावरकरांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृह नेते, गणेश खणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (डोंगरी) गोंडुराम बांगर, कारागृह अधीक्षक राहुल कंठीकर आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे बाल सुधारगृहातील ४० मुलांनी कार्यक्रमाला श्रोते म्हणून उपस्थित दर्शविली होती.(Statue of Swatantryaveer Savarkar)
 
उपस्थितांना संबोधत रवींद्र साठे म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीतील अनेक क्रांतिकारकांच्या योगदानामुळे भारत स्वतंत्र झाला. त्यापैकी एक होते स्वातंत्र्यवीर सावरकर. आज आपल्याला खेळण्यासाठी कारागृह परिसरात मैदान आहे, विविध साहित्य आहेत.(Statue of Swatantryaveer Savarkar)
 
सावरकरांना मात्र त्याकाळी एकाच लहानशा काळकोठडीत बंदिस्त ठेवण्यात आले होते. युवकांमध्ये देशाप्रती भाव जागृत होण्यासाठी सावरकरांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, आभार व्यक्त करणे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन उत्तम नागरिक होणे, हे आपले कर्तव्य आहे.(Statue of Swatantryaveer Savarkar)
 
यावेळी रवींद्र साठे यांनी मुलांना पुस्तके वाचण्याबाबत आवाहन केले. त्याचबरोबर खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून बाल सुधारगृहातील मुलांना सोबत घेऊन लघु उद्योग लवकरच सुरु करण्याबाबत आश्वस्त केले. सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम पवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरम् ने झाली.(Statue of Swatantryaveer Savarkar)
 
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांचे योगदान होते. त्यापैकी काही नावे अशी आहेत की इतिहासाने जेवढा न्याय द्यायला हवा होता तेवढा दिला गेला नाही. मात्र आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार सामान्य जनता आत्मसात करू लागलीय. स्वातंत्र्यवीर सावरकरांना डोंगरी कारागृहात ज्या कोठडीमध्ये ठेवले होते, त्या कोठडीत प्रतिमा अनावरणाच्या निमित्ताने प्रवेश करताना डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. देशाप्रती असलेले त्यांचे योगदान कोणी कधीच विसरू शकणार नाही.(Statue of Swatantryaveer Savarkar)
- गणेश खणकर, सभागृह नेते, बृहन्मुंबई महानगरपालिका
 
स्वातंत्र्यवीर सावरकर हे आद्य क्रांतिकारक तर होतेच, मात्र ते प्रेरक नेतेसुद्धा होते. देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने त्यांनी जी स्वप्नं पाहिली ती कृतीत उतरवण्यासाठी जीवनाची आहुती दिली. हिंदूंना एकसंध ठेवण्याचे कार्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले.(Statue of Swatantryaveer Savarkar)
- गोंडुराम बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (डोंगरी)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक