‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ लवकरच, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
26-Feb-2026
Total Views |
नागपूर : (Chhatrapati Shivaji Maharaj Maharajsva Abhiyan) महसूल विभागाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून नोंदणी प्रक्रियेसाठी ऑनलाइन ई-बॉण्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली तसेच राज्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ (Chhatrapati Shivaji Maharaj Maharajsva Abhiyan) राबवण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागातील नव्या सुविधा, राज्यसभा निवडणूक तसेच जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर भूमिका स्पष्ट केली.(Chhatrapati Shivaji Maharaj Maharajsva Abhiyan)
बावनकुळे म्हणाले की, नोंदणी प्रक्रियेसाठी आता ऑनलाइन ई-बॉण्ड घेण्याची सवलत देण्यात आली आहे. या ई-बॉण्डच्या माध्यमातून मुद्रांक शुल्क ऑनलाइन भरता येणार असून नागरिकांना घरबसल्या ई-बॉण्ड काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. मुद्रांक शुल्क विभागाने हे एक आधुनिक आणि नागरिकांसाठी सोयीचे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी सांगितले.(Chhatrapati Shivaji Maharaj Maharajsva Abhiyan)
दरम्यान, राज्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ राबवण्याची तयारी सुरू असून मार्च महिन्यात ७ आणि १४ तारखेला दोन दिवस, तर एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी दोन-दोन दिवस मंडळस्तरावर शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांमध्ये तुकडेबंदी, जिवंत सातबारा ते ‘एन’ नोंदणीसह महसूल विभागाच्या सर्व सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.(Chhatrapati Shivaji Maharaj Maharajsva Abhiyan)
या शिबिरांना जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून आपण स्वतःही या शिबिरांना भेट देणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.(Chhatrapati Shivaji Maharaj Maharajsva Abhiyan)
राज्यसभा निवडणुकीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली असून पक्षाकडे आलेली नावे केंद्रीय कोअर कमिटीकडे पाठवली जाणार आहेत. आमच्याकडे असलेल्या संख्याबळानुसार भाजपला चार जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यसभा निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले जात असले तरी एकमत न झाल्यास निवडणूक होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Chhatrapati Shivaji Maharaj Maharajsva Abhiyan)
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत विचारले असता, बावनकुळे म्हणाले की, त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली जाईल आणि चर्चेतूनच योग्य तो मार्ग काढण्याचा निर्णय घेतला जाईल.(Chhatrapati Shivaji Maharaj Maharajsva Abhiyan)