Dattatreya Hosabale : भूमी, तिला मातृभूमी मानणारे लोक आणि त्यांच्या अंगी असलेली संस्कृती या तीन घटकांनी राष्ट्राची ओळख ठरते

सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे प्रतिपादन

    26-Feb-2026   
Total Views |
Dattatreya Hosabale
 
मुंबई : (Dattatreya Hosabale) “आपण एक राष्ट्र, एक जनता आहोत आणि आपली संस्कृती व डीएनए एकच आहे. संस्कृती ही राष्ट्राच्या आत्म्याची अभिव्यक्ती आहे आणि अध्यात्म हा त्या आत्म्याचा गाभा आहे. राष्ट्राची ओळख ही भूमी, तिला मातृभूमी मानणारे लोक आणि त्यांच्या अंगी असलेली संस्कृती तीन घटकांनी ठरते”, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे (Dattatreya Hosabale) यांनी केले.
 
संघ शताब्दी वर्षानिमित्त एर्नाकुलम येथील अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे आयोजित ‘ब्लूमिंग भारत – यंग इंटेलेक्च्युअल मीट’ कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. ते (Dattatreya Hosabale) म्हणाले, भाषा वेगवेगळ्या असल्या तरी संस्कृती एकच आहे. अभिव्यक्तीचे हजारो प्रकार असले तरी सार एकच आहे. संगीत कोणतेही असो, त्याचा पाया सप्तस्वरच असतो. रामायणाच्या अनेक आवृत्त्या आहेत; परंतु रामकथा एकच आहे. केरळमध्ये ‘विषू’ आणि आसाममध्ये ‘बिहू’ म्हणून साजरा होणारा कृषी उत्सव मुळात एकच आहे. विविध कला, सण, म्हणी आणि कथा या सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक आहेत, असे (Dattatreya Hosabale) त्यांनी सांगितले.
 
त्यांनी पुढे अधोरेखित केले की, धर्म राष्ट्राला आधार देतो आणि त्याचे आचरण आवश्यक आहे. धर्माच्या पायाशिवाय अर्थ (संपत्ती) आणि काम (इच्छा) हे व्यक्ती व समाज दोघांच्याही विनाशास कारणीभूत ठरतात. आपण प्राचीन राष्ट्र आहोत; १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेले राष्ट्र नाही. ‘राष्ट्र’ ही आपली संकल्पना पाश्चात्त्य ‘नेशन’पेक्षा वेगळी आहे. भारत हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. स्वामी विवेकानंदांनी ‘जगदंबा’ आणि महर्षी अरविंदांनी ‘जगत जननी’ असे वर्णन केलेला भारत हा एक सजीव राष्ट्र आहे, असे (Dattatreya Hosabale) त्यांनी सांगितले.
 
या कार्यक्रमाला अमृता हॉस्पिटल्सचे संचालक डॉ. प्रेम नायर, राजागिरी इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष डॉ. साजू मदवनक्कड आणि संघाचे दक्षिण केरळ प्रांत संघचालक प्रा. एम. एस. रमेशन उपस्थित होते.(Dattatreya Hosabale)
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक