मुंबई : (Malegaon Namaz Adah Case) मालेगाव येथे महापालिकेच्या कार्यालयाच्या आत नमाज अदा केल्याचा प्रकार निदर्शनास आलाय. या संबंधी व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांनी या घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल करण्याची तसेच संबंधित दोषी कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.(Malegaon Namaz Adah Case)
अशी माहिती आहे की, प्रत्यक्षात, वीज कपातीच्या समस्येविरोधात मालेगाव लोकसंघर्ष समितीचे कार्यकर्ते महापालिकेच्या वीज विभागात आंदोलनासाठी गेले होते. आंदोलनादरम्यान नमाजची वेळ झाल्याने काही जणांनी कार्यालयाच्या आतच नमाज अदा केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आंदोलनकर्त्यांनी असा दावा केलाय की, नमाज अदा करण्यासाठी ते बाहेर गेल्यास, अधिकारी कार्यालय बंद करून निघून जातील. त्यामुळे त्यांनी कार्यालयाच्या आतच नमाज अदा केली. दुसरीकडे, पोलिस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकार बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.(Malegaon Namaz Adah Case)
यापूर्वी नवनिर्वाचित उपमहापौर शान-ए- हिंद यांनी त्यांच्या उपमहापौर दालनात ‘जिहादी’ टिपू सुलतान यांच्या फोटो लावल्याचे सोशल मीडियावरून जोरदार व्हायरल झाले होते. हिंदुत्वप्रेमी संघटनांनी आपला इंगा दाखवल्यानंतर हे छायाचित्र दालनातून काढून टाकले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपूचे गोडवे गात हिंदू विरोधी वक्तव्य केले होते. 'टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे', असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.(Malegaon Namaz Adah Case)
सरकारी कार्यालयात नमाज पठण करणे हा संविधानाचा घनघोर आपमान आहे, बहुसंख्याक हिंदूंचा अपमान आहे, धार्मिक तेढ निर्माण करणे व समाजामध्ये अ व्यवस्था निर्माण करणे याबद्दल तेथील अधिकाऱ्यांवर महापौरांवर कठोर कठोर कारवाई व्हावी, गेल्या काही दिवसांपूर्वी टिपू सुलतान चा फोटो कार्यालयात लावला होता हे कृत्य सुद्धा खूप वाईट आहे. यावर कारवाई नाही झाली तर सरकारी कार्यालयात नमाज पठण करणे हे ग्राह्य आहे असं समजून इथून पुढे सर्व सरकारी कार्यालयात वेदपाठ रुद्राभिषेक व महापूजा आयोजित केली जाईल.(Malegaon Namaz Adah Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक