Rani Bagh: राणी बागेच्या आधुनिकीकरणाला वेग; १३६.७० कोटींची भरीव तरतूद

    25-Feb-2026
Total Views |
 
Rani Bagh
 
मुंबई : (Rani Bagh) वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या सर्वांगीण आधुनिकीकरणासाठी आणि नव्या प्रकल्पांसाठी महापालिकेने मोठी आर्थिक तरतूद प्रस्तावित केली आहे. प्राणिसंग्रहालयाचा विस्तार, मत्स्यालय, विदेशी प्राणी व पक्षी प्रदर्शनी यांसारख्या उपक्रमांमुळे राणी बागेचे स्वरूप अधिक आकर्षक व आधुनिक होणार आहे. (Rani Bagh)
 
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथे टप्प्याटप्प्याने अत्याधुनिक सुविधांची उभारणी सुरू असून २०२५-२६ या वर्षात ४४.३१ कोटी रुपये आणि २०२६-२७ मध्ये १३६.७० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. येत्या काळात पक्ष्यांसाठी स्वतंत्र रुग्णालय, स्वयंपाकघर, अंतर्गत सेवा रस्ते आणि पूरक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. सर्व कामे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. (Rani Bagh)
 
हेही वाचा:  BMC Budget: ‘डिजिटल ते ड्रग्ज जनजागृती…’ महापालिकेच्या बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी आणखी काय?
 
उद्यानात सागरी जीवनावर आधारित मत्स्यालय उभारण्यात येत असून स्थानिक माशांच्या सत्तरहून अधिक प्रजाती येथे प्रदर्शित केल्या जाणार आहेत. हा प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल. तसेच अतिरिक्त भूखंडावर १८ विशिष्ट विदेशी प्राण्यांचा अधिवास असलेली प्रदर्शनी उभारली जाणार आहे. यामध्ये आफ्रिकन थीमवर आधारित दोन मजली ‘चित्ता उपहारगृह’ उभारले जाणार असून तेथून जिराफ व चित्त्यांचे दर्शन पर्यटकांना घेता येणार आहे. (Rani Bagh)
 
याशिवाय, नाहूर, मुलुंड (प.) येथे विदेशी पक्षी प्रदर्शनासह स्वतंत्र पक्षी उद्यान उभारण्याची योजना असून दुर्मिळ व रंगीबेरंगी पक्ष्यांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. हा प्रकल्पही २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या उपक्रमांमुळे राणी बागेचा पर्यटन आणि शैक्षणिक केंद्र म्हणून दर्जा अधिक उंचावणार आहे. (Rani Bagh)