Anti Love Jihad Act : अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा

राज्यातील हिंदू संघटनांची राज्य सरकारकडे मागणी

Total Views |
Anti Love Jihad Act
 
मुंबई : (Anti Love Jihad Act) नुकतीच भिगवण येथे घडलेली लव्ह जिहादची घटना आणि राज्यात घडणाऱ्या शेकडो घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा, यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि अन्य हिंदू संघटनांकडून प्रशासनाला निवेदने देण्यात आली. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील पत्र पाठवून या विषयात लक्ष देऊन कायदा करण्याची मागणी करण्यात आली.(Anti Love Jihad Act)
 
गुजरात सरकारने या विषयावर कायदा केल्यानंतर महाराष्ट्रात देखील अशाप्रकारचा कायदा करण्याची मागणी वाढत आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद' आणि 'अवैध धर्मांतर' या गंभीर समस्यांविरोधात कायदा करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जनआक्रोश मोर्चे काढले. त्यावेळी सरकारने या विषयाचे गांभीर्य ओळखून 'लव्ह जिहाद' विरोधात कठोर कायदा करण्याचे आश्वासन दिले होते.(Anti Love Jihad Act)
 
हेही  वाचा : Chitra Wagh: ‘राष्ट्रवादी सोडताना दादांचा फोन आला, म्हणाले…’; चित्रा वाघ सभागृहात भावुक 
 
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातून बेपत्ता असलेल्या १,७८,००० हून अधिक महिला आणि मुलींचा शोध घेण्यासाठी 'विशेष मोहीम' राबवावी आणि त्यातील 'लव्ह जिहाद'ची प्रकरणे वेगळी नोंद करावीत. प्रत्येक जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली 'लव्ह जिहाद विरोधी विशेष पथक' स्थापन करून यातील प्रकरणांचा निकाल ६ महिन्यांच्या आत लावावा.(Anti Love Jihad Act)
 
निवेदनातील अन्य मागण्या
 
- लव्ह जिहादची प्रकरणे घडवण्यासाठी विदेशातून येणारा निधी, जिहादी नेटवर्क आणि तस्करीचा सखोल तपास करून मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
 
- धर्मांतर किंवा आंतरधर्मीय विवाह करण्यापूर्वी किमान ६० दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे आणि पोलीस चौकशी होणे बंधनकारक करावे.
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.