Majhi Vasundhara campaign: 'माझी वसुंधरा' अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेला उपक्रम ईश्वरीय कार्य

    22-Feb-2026   
Total Views |
 
Majhi Vasundhara campaign
 
मुंबई : (Majhi Vasundhara campaign) पर्यावरण रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. या अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य हे ईश्वरीय सेवा आहे माझी वसुंधरा अभियानाला आता लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे. भावी पिढीच्या निरोगी आयुष्यासाठी जनसामान्यांच्या मदतीने हाती घेतलेले हे ईश्वरीय कार्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. (Majhi Vasundhara campaign)
 
वरळी एनएससीआय डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित 'माझी वसुंधरा' राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी माझी वसुंधरा मिशन ४.० आणि ५.० अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. (Majhi Vasundhara campaign)
 
राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, "पर्यावरणासाठी शासन स्तरावर पहिल्यांदाच एवढ्या व्यापक प्रमाणात आणि प्रभावी पद्धतीने मोहिम राबविल्याबद्दल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे अभिनंदन. पर्यावरण रक्षण हे संपूर्ण जगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे तापमान वाढू लागले आहे. नैसर्गिक संकट ओढावण्याची भिती जागतिक पातळीवर व्यक्त केली जात आहेत. निसर्गाचे, पर्यावरणाचे रक्षण करणे हे जीवसृष्टीसाठी महत्वाचे आहे." (Majhi Vasundhara campaign)
 
पर्यावरण रक्षणासाठी पंचसूत्री
 
यावेळी राज्यपालांनी पर्यावरण रक्षणासाठी पंचसूत्री मांडली. पर्यावरणाचे संवर्धन विकास धोरणाच्या केंद्रस्थानी ठेवून, प्रत्येक विकास प्रकल्पात 'ग्रीन ऑडिट' अनिवार्य करावे. स्थानिक पातळीवर हरित अर्थव्यवस्थेला चालना देऊन, स्थानिक स्वराज्य संस्थांनी 'ग्रीन बजेट' तयार करावे आणि कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा, पावसाच्या पाण्याचे संकलन तसेच नैसर्गिक शेतीला आर्थिक प्रोत्साहन द्यावे. पर्यावरण शिक्षणास प्रोत्साहन देऊन माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून जनसहभागाला चळवळीचे स्वरूप द्यावे आणि प्रत्येक नागरिक क्लायमेट वॉरियर बनावावा. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे वृक्षारोपण, जलसंधारण आणि प्रदूषण नियंत्रणाची रिअल-टाइम पाहणी व्यवस्था निर्माण करावी, जेणेकरून पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित होईल. 'माझी वसुंधरा' अभियान हे सर्वांनी ध्येय म्हणून स्वीकारल्यास नक्कीच अपेक्षित बदल घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Majhi Vasundhara campaign)
 
माझी वसुंधरा अभियान ही जनचळवळ - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
 
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "पृथ्वी, वायू, जल, अग्नि आणि आकाश या पंचतत्त्वांचे जतन करणे आपली संस्कृती आणि कर्तव्य आहे. हवामान बदलाचे संकट आपल्यासमोर उभे असताना ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून केलेली वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन आणि जलसंधारणाची कामे कौतुकास्पद आहेत. ‘माझी वसुंधरा’ हे अभियान नाही तर लोकचळवळ झाली पाहिजे. पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाचा विचार करत असताना आपल्याला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. विकास केवळ आर्थिक वाढीपुरता मर्यादित न ठेवता, शाश्वत, पर्यावरणपूरक आणि भावी पिढ्यांचा विचार करणारा असावा, हे अजितदादांचे स्वप्न होते." (Majhi Vasundhara campaign)
 
अभियानामुळे पर्यावरण संरक्षण विषय प्रत्यक्ष कृतीत उतरला - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
 
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, "महाराष्ट्राचा विकास पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन दृष्टीकोनावर आधारित असला पाहिजे. यासाठी नियोजनबद्ध कृती, संस्थात्मक बळकटी आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून आपण शाश्वत विकासातून सक्षम महाराष्ट्र घडविण्यास कटिबद्ध आहोत. आज 'माझी वसुंधरा' अभियानामुळे पर्यावरण संरक्षण हा विषय प्रत्यक्ष कृतीत उतरला आहे. शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिक यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे राज्यात शाश्वततेची मजबूत पायाभरणी होत आहे. राज्य शासनाने पर्यावरणीय प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान या राज्यव्यापी उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. जैविक शेती ही अभियान पुढच्या टप्यात राबविण्यात येणार असून नैसर्गिक शेतीचा अवलंब करून सुपीक जमीन, शुद्ध पाणी आणि शुद्ध हवेसाठी पर्यावरणरक्षणाचा संकल्प करा." (Majhi Vasundhara campaign)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....