उद्या इंदापूर, दौंड आणि बारामती बंद; बारामती येथील बैठकीनंतर सकल हिंदू समाजाचा निर्णय

Total Views |

मुंबई :
 
भिगवण येथील लव्ह जिहाद प्रकरणासंदर्भात बारामती येथे शनिवारी दि. २१ रोजी सकल हिंदू समाजाची बैठक पार पडली. यावेळी या घटनेचा निषेध म्हणून इंदापूर, दौंड आणि बारामती या तीन तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव नवनाथ पडळकर यांनी दिली.

यावेळी भिगवण प्रकरणातील आरोपींवर पोक्सोअंतर्गत कारवाई करावी, राज्यात धर्मांतरण विरोधी कायदा लागू करावा तसेच भिगवण घटनेतील मुख्य सूत्रधार असणाऱ्या व्यक्तीवर मोका लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. पोलिसांनी कारवाई केली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन देखील उभारण्याची योजना या बैठकीत करण्यात आली.

या बैठकीत बारामती, इंदापूर आणि दौंड परिसरातील सकल हिंदू समाजातील अनेक नागरिक उपस्थित होते. हि घटना राज्यात अन्य ठिकाणी घडू नये यासाठी जनजागृती करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या प्रकरणात विशेष लक्ष घालण्याची मागणी करण्यात येणार आहे.




चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.