मुंबई :जगात ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मांची स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आहेत, त्याचप्रमाणे भारताची सभ्यता आणि संस्कृती हजारो वर्षे जुनी आहे आणि ती शाश्वत परंपरेत रुजलेली आहे, त्यामुळे हे हिंदू राष्ट्र आहे, असे मत जेष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले की, अनेक देशांनी वेगवेगळ्या धर्मांच्या आधारे आपली ओळख स्थापित केली आहे. मग हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह का उपस्थित केले जाते. त्यामुळे भारतात हिंदू राष्ट्राच्या चर्चेला असामान्य किंवा वादग्रस्त म्हणणे योग्य नाही. या विषयावर खुली आणि तार्किक चर्चा झाली पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, वंदे मातरम् बाबत केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्व आणली हा एक अद्भुत आणि उत्कृष्ट निर्णय आहे. त्यांनी सांगितले की ते गेल्या ३२ वर्षांपासून वंदे मातरम् म्हणत आहेत. परदेशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये वंदे मातरम् अभिवादनाचा प्रचार करण्यात त्यांनी भूमिका बजावली आहे.
वंदे मातरम केवळ एका धर्माचे गीत नाही कपूर म्हणाले की, वंदे मातरम् हे केवळ एक गीत नाही तर राष्ट्राचा आत्म्या त्या गीतात सामावला आहे. सुजलाम सुफलाम या गाण्याचे बोल सत्कर्म आणि नैतिकतेशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की हे गीत केवळ एका धर्माचे नाही तर संपूर्ण देश आणि जगाच्या कल्याणासाठी आहे.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.