नवी दिल्ली : (CM Devendra Fadnavis) कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे सुरू असलेल्या 'इंडिया एआय इम्पँक्ट समिट-२०२६' मधील 'एआय इन अँग्रिकल्चर' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार आणि मंत्री नितेश राणे उपस्थित होते. या चर्चासत्रात मुख्य सचिव राजेशकुमार अगरवाल, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव देवेश चतुर्वेदी, कृषि सचिव विकासचंद्र रस्तोगी, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन, जागतिक बँकेच्या दक्षिण आशिया विभागाचे उपाध्यक्ष जोहॅन्स झुट, एकस्टेप फाउंडेशनचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर मरुवाडा सहभागी झाले होते.(CM Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, "सध्या जगभरात शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे अन्न सुरक्षिततेवर ताण आला आहे. अनिश्चित वातावरण, घसरणारी पाणी पातळी, जमिनीचा खालावणारा दर्जा, पुरवठा साखळीतील अडथळे आणि जागतिक मार्केटमधील अनिश्चितता यांचा या आव्हानांमध्ये समावेश आहे. अशा परिस्थितीत एआय महत्वाची भूमिका पार पाडू शकते. जगातील अनेक देशांसाठी कृषी विषय केवळ आर्थिक विषयाशी निगडीत नाही, तर कृषी विषय अन्न सुरक्षितता, सामाजिक सुरक्षितता, आर्थिक स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. यामुळे भारताने याबाबत फार पूर्वीच विचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या इंडिया एआय मिशनमध्ये कृषी क्षेत्राचा प्रामुख्याने विचार केला आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर , सेवापुरवठा, समावेशकता यांचा विचार केला गेला आहे."(CM Devendra Fadnavis)
"एआय शेतीसाठी आवश्यक असणारी बँकवर्ड आणि फाँरवर्ड लिंकेजची माहिती देऊ शकते. यामध्ये वातावरणातील बदल, जलसिंचन, खतपुरवठा, बाजारभावातील फेरबदल आणि पुरवठा साखळी याबाबत माहिती देऊ शकते. आर्टीफिशीअल इंटेलिजन्स जादूची कांडी नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी एआय माडेल विश्वासार्ह डेटा, सुशासन आणि लोकांशी असलेले उत्तरदायित्व यावर आधारित असायला हवे. विश्वासाशिवाय शेतीशी निगडीत विविध सेवा आपण देऊ शकणार नाही," असेही त्यांनी (CM Devendra Fadnavis) सांगितले.
महाराष्ट्राचे महाॲग्री एआय धोरण सर्वांसाठी खुले
"शेतीतील आर्टीफिशीअल इंटेलिजन्सचा वापर ही बाब केवळ प्रदर्शने आणि चर्चेपुरती मर्यादीत न राहता ती लाखो लोकांपर्यंत पोहोचायला हवे. यासाठी महाराष्ट्र शासनाने महाॲग्री एआय धोरण स्वीकारले आहे. हे धोरण सर्वांसाठी खुले आणि परस्पर समन्वय साधणारे आहे. या धोरणावर आधारित विकसित केलेला मोबाईल प्लॅटफॉर्म बहुभाषांमध्ये वैयक्तिक सल्ला देतो, बाजारपेठेतील घडामोडींची माहिती देतो, वातावरणातील बदलाबाबत सूचना देतो आणि अनेक शासकीय योजनांबाबत सल्ला देतो. या सेवेला शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे, ही बाब शेतकरी एआयसाठी सज्ज आहेत, स्पष्ट करते. एआयवर आधारित टेस्ट, इंटीग्रेशन आणि क्राँप सँप विकसित करणे आमचे ध्येय आहे. शेतीशी निगडीत सर्व डेटाचे एकत्रीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या डेटाच्या आधारे शेती आणि शेतकऱ्यांचा विकासासाठी काम झाले पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी भारत सरकार, जागतिक संशोधन संस्था, गुंतवणूकदार यांच्याशी महाराष्ट्र सरकार सहकार्य करण्यासाठी तयार आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....