Rahul Gandhi : राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर!

मानहानी प्रकरणात नवा जामीनदार सादर; राजेश कुंटे आपल्या मागणीवर ठाम

    21-Feb-2026   
Total Views |
Rahul Gandhi
 
मुंबई : (Rahul Gandhi) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) शनिवारी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर झाले. संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात नवा जामीनदार सादर करण्यासाठी त्यांना न्यायालयाने हजर राहण्यास सांगितले होते. कारण त्यांचे आधीचे जामीनदार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निधन झाले. या प्रकरणात राहुल गांधी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना नवे जामीनदार म्हणून सादर केले.(Rahul Gandhi)
 
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे वकील नारायण अय्यर यांनी सुनावणीनंतर सांगितले, “राहुल गांधी यांना जामीन देणाऱ्या व्यक्तीचे निधन झाल्याने नवी हमी (फ्रेश सिक्युरिटी) देणे आवश्यक होते. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बाँड भरला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या प्रकरणाची लवकर सुनावणी होईल. खासदार-आमदार न्यायालय सुनावणीची गती वाढवते. प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल, आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे.”(Rahul Gandhi)
 
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यापूर्वीही त्यांच्या विधानांबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार अनेक वेळा माफी मागितली आहे. यावेळीही ते माफी मागून प्रकरण निकाली काढणार का, याबाबत विचारले असता त्यांच्या वकिलांनी सांगितले, “माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आज केवळ जामीन मिळवणे आवश्यक होते. आम्हाला नवी हमी सादर करायची होती. प्रकरणाची पुढील सुनावणी मार्चमध्ये होणार आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्देशांनुसारच पुढे जात आहोत.”(Rahul Gandhi)
 
हेही वाचा : Neal Katyal : टॅरिफ प्रकरणात ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टाचा दणका; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आव्हान देणारे भारतीय वंशाचे कायदेतज्ज्ञ कोण?  
 
तक्रारदार राजेश कुंटे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या आरोपानुसार, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनाले गावातील एका सभेत भाषण करताना काँग्रेस नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमागे संघाचा हात असल्याचे वक्तव्य केले होते. कुंटे यांनी भारतीय दंड संहिता कलम ५०० (मानहानी) अंतर्गत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की या खोट्या विधानामुळे संघाची प्रतिमा मलिन झाली.(Rahul Gandhi)
 
भारतात कायद्याने राज्य चालते. कायद्यापुढे कोणालाही विशेष अधिकार नाही, हे आज सिद्ध झाले. कोर्टाने त्यांना विशेष कामकाज असल्यास उपस्थित राहण्याची सवलत दिलेली आहे. त्यामुळे ज्यावेळी पुन्हा आवश्यकता भासेल त्यावेळी ते पुन्हा उपस्थित राहतील. राहुल गांधींना कायद्यान्वये जी शिक्षा आहे ती व्हावी, नाहीतर त्यांनी या सगळ्या संदर्भात माफी मागावी. त्यांनी आता माफी मागण्यास नकार दिलाय, तर कायद्यानुसार कारवाई होईल.(Rahul Gandhi)
- राजेश कुंटे, तक्रारदार
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक