Sharmila Pimpolkar : महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते ‘रेबीज मुक्त ठाणे’ मोहिमेचा शुभारंभ

    21-Feb-2026
Total Views |
Sharmila Pimpolkar
 
ठाणे : (Sharmila Pimpolkar) ठाणे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी ठाणे महानगरपालिका व प्राणी मित्र संस्थांच्या वतीने विशेष ‘रेबीज मुक्त’ मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ व फलकाचे अनावरण आज महापौर शर्मिला पिंपळोलकर (Sharmila Pimpolkar) यांच्या हस्ते महापालिकेत करण्यात आले.
 
यावेळी उपायुक्त मनिष जोशी, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेविका मीनल संख्ये मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर तसेच रेबीज मुक्त मोहिमेसाठी तयार करण्यात आलेले पथक उपस्थित होते.(Sharmila Pimpolkar)
 
हेही वाचा : Mumbai BJP Youth Protest : काँग्रेसच्या देशविरोधी कृत्याच्या निषेधार्थ भाजयुमोचे मुंबईत आंदोलन 
 
‘रेबीज मुक्त ठाणे’ अशी ही योजना असून यासाठी ५० जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून ७ दिवसांत ५००० भटक्या कुत्र्यांना रेबीज लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.(Sharmila Pimpolkar)
 
लसीकरण केलेल्या भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात केशरी रंगाचा रिफ्लेक्टर पट्टा बांधण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात २५०००भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून पुढील काळातही ही मोहिम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले.(Sharmila Pimpolkar)