Prabhakar Shinde : अर्थसंकल्पीय शिस्त व नागरी कामांवर भर देणार

कामकाजात पारदर्शकता आणणार - स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे

    21-Feb-2026
Total Views |
Prabhakar Shinde
 
मुंबई : (Prabhakar Shinde) मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रभाकर शिंदे यांनी आर्थिक शिस्त, महसूल वाढ, पावसाळी तयारी, आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका मांडली.(Prabhakar Shinde)
 
शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना अभिवादन करून मनोगत व्यक्त केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.(Prabhakar Shinde)
 
स्थायी समितीचे अध्यक्षपद हे जबाबदारीचे असल्याची जाणीव असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा अनेक राज्यांच्या अर्थसंकल्पाएवढा मोठा आहे. या निधीचा योग्य वापर होणे, विकासकामांना वेळेत मंजुरी देणे आणि नागरिकांच्या कररकमेचा पारदर्शक विनियोग होणे यावर समिती लक्ष ठेवेल. महसूल वाढीसाठी कर निर्धारण व संकलन यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. थकबाकी वसुली, देयकांची वेळेत पाठवणी, करआक्षेपांचे जलद निराकरण आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी (Prabhakar Shinde) स्पष्ट केले.
 
हेही वाचा : Sanjay Kelkar : विद्यापीठाने संस्थेला आकारलेला लाखोंचा दंड विद्यार्थ्यांच्या माथी 
 
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, मॅनहोल स्वच्छता आणि रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे एप्रिल-मे महिन्यातच पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. मोठ्या रस्त्यांवर सिमेंट काँक्रिटीकरण करताना ‘युटिलिटी डक्ट’ची व्यवस्था केल्यास वारंवार रस्ते खोदण्यावर आळा बसेल, असे ते म्हणाले. मेट्रो कामांमुळे वाढलेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर डिजिटल फलकांद्वारे नागरिकांना माहिती देण्याचीही सूचना त्यांनी केली.(Prabhakar Shinde)
 
आरोग्य सेवांबाबत बोलताना महापालिकेच्या रुग्णालयांत दर्जेदार व अद्ययावत औषधे उपलब्ध करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन कचरा व्यवस्थापन सुधारण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रणासाठी संबंधित विभागांनी अधिक प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हरित क्षेत्रांचे संरक्षण आणि स्थानिक वृक्षप्रजातींच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन धोरण राबविण्याची सूचना त्यांनी केली.(Prabhakar Shinde)
 
अग्निशमन दलाने उंच इमारती आणि अरुंद रस्त्यांमधील आगींवर नियंत्रणासाठी नवीन उपाययोजना अमलात आणाव्यात, असेही त्यांनी सांगितले. महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि प्रशासनाकडून सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि महापालिकेत महायुती’ या समन्वयातून मुंबईतील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.(Prabhakar Shinde)