Mumbai BJP Youth Protest : काँग्रेसच्या देशविरोधी कृत्याच्या निषेधार्थ भाजयुमोचे मुंबईत आंदोलन

    21-Feb-2026   
Total Views |
Mumbai BJP Youth Protest
 
मुंबई : (Mumbai BJP Youth Protest) काँग्रेसच्या देशविरोधी कृत्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय, टिळक भवन येथे निषेध आंदोलन करण्यात आले. भाजयुमो मुंबईचे महामंत्री दीपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.(Mumbai BJP Youth Protest)
 
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ दरम्यान काँग्रेस पक्ष आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अश्लील, घृणास्पद आणि देशविरोधी कृत्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण जग भारताकडे (एआय) क्षेत्रातील जागतिक नेतृत्व म्हणून पाहत असताना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्र असलेले टी-शर्ट उतरवून “PM is Compromised” तसेच इंडिया–यू.एस. ट्रेड डीलसंदर्भातील घोषणा देत कार्यक्रमात अराजकता निर्माण केली. हे कृत्य केवळ लाजिरवाणे नसून भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन करणारे आणि युवा भारताच्या प्रगतीवर थेट आघात करणारे आहे.(Mumbai BJP Youth Protest)
 
हेही वाचा : AI Summit: ‘एआय समिट’मध्ये आठ वर्षीय रणवीर सचदेवची जादू! 
 
भाजयुमो मुंबईचे अध्यक्ष तथा नगरसेवक तेजिंदर सिंह तिवाना म्हणाले की, आंतरराष्ट्रीय मंचावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली ही कृती अत्यंत निंदनीय आहे. एआय समिटमध्ये जगभरातील नेते सहभागी होत असताना भारताची प्रगती काँग्रेसला सहन होत नाही. अशा प्रकारच्या कृतीतून काँग्रेसने आपली मानसिकता आणि उद्देश स्पष्ट केले आहेत. काँग्रेस पक्षाचे हे वर्तन असभ्य, घोर निंदनीय आणि पूर्णपणे देशविरोधी आहे. पंतप्रधानांचा अपमान करून आंतरराष्ट्रीय स्तरावर गोंधळ घालणे हे केवळ लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारे नसून देशाच्या प्रगतीवर आणि युवांच्या भवितव्यावर आघात करणारे आहे. भाजयुमो मुंबईचे युवा कार्यकर्ते या देशविरोधी कृतीचा तीव्र निषेध करीत असून काँग्रेस पक्षाने तात्काळ माफी मागावी आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे."(Mumbai BJP Youth Protest)
 
यावेळी भाजयुमो मुंबईचे महामंत्री दीपक सिंह म्हणाले की, "काँग्रेस पक्ष आता पंतप्रधानांचा विरोध करता करता देशाचाच विरोध करू लागला आहे. युवा भारत आता जागृत झाला असून विकासाच्या मार्गातील कोणतीही अडचण सहन केली जाणार नाही. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एआय, तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भरतेच्या क्षेत्रात अग्रस्थानी पोहोचेल."(Mumbai BJP Youth Protest)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....