मुंबई : (Amit Shah on Rahul Gandhi) लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलत असताना माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा उल्लेख केला. दरम्यान यावरुन सभागृहात गदारोळ झाल्याचे पाहण्यास मिळाले. राहुल गांधी म्हणाले की, नरवणे यांच्या पुस्तकात उल्लेख आहे की, डोकलाममध्ये आणि भारतीय सीमेमध्ये चीनने घुसखोरी केली आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. याच्या प्रत्युत्तरात सत्ताधारी पक्षाने राहुल गांधी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करुन त्यांची बोलती बंद केली.(Amit Shah on Rahul Gandhi)
नेमकं लोकसभेत काय घडलं?
राष्ट्रपतीच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलत असताना राहुल गांधी यांनी जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. यावर जे पुस्तक प्रकाशितच झालेले नाही ते पुस्तक तुम्ही सभागृहात कसे काय वाचता? असा प्रश्न राजनाथ सिंह यांनी विचारला. तर ओम बिर्ला यांनीही हे सांगितले की, पुस्तक प्रकाशित झालेले नाही तर मग ते अधिकृत कसे काय मानले जाणार? सदनाची मर्यादा तुम्ही ओलांडू नका, असं ओम बिर्ला राहुल गांधींना म्हणाले. तर हे पुस्तक १०० टक्के नरवणे यांचे आहे आणि अधिकृत आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.(Amit Shah on Rahul Gandhi)
अमित शाह यांनी काय म्हटलं?
मंत्री राजनाथ सिंह यांनी आक्षेप घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही जनरल नरवणे यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं नाही असं म्हटलं. शाह म्हणाले की, “जे पुस्तक अद्याप प्रकाशितच झालेले नाही आणि ज्यातील मजकूर अधिकृतपणे सार्वजनिक झालेला नाही, अशा अप्रकाशित साहित्याचा संदर्भ संसदेच्या कामकाजात घेता येणार नाही.” संसदेच्या नियमांनुसार अशा अप्रकाशित माहितीवर चर्चा करणे चुकीचे असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.(Amit Shah on Rahul Gandhi)
राहुल गांधींकडून भारत चीन सीमेवर झालेल्या संघर्षाच्या अनुषंगाने हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला. पुस्तक प्रकाशित झालं आहे की नाही ते राहुल गांधींनी सांगावं अशी मागणी लोकसभेत करण्यात आली ज्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात गदारोळ झाला.(Amit Shah on Rahul Gandhi)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\