Al Impact Summit 2026 : राजधानी सज्ज! 'एआय इम्पॅक्ट समिट २०२६'चा भव्य शुभारंभ

पंतप्रधान मोदींच्या हस्ते "एआय इम्पॅक्ट एक्स्पो"चं उद्‌घाटन

    16-Feb-2026   
Total Views |

Al Impact Summit 2026
 
नवी दिल्ली : (Al Impact Summit 2026) राजधानी दिल्ली येथे सोमवार दि. १६ फेब्रुवारीपासून 'एआय इम्पॅक्ट समिट २०२६' ला सुरुवात झाली आहे. भारत यजमानपद भूषवत असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेसाठी जगभरातील नेते, धोरणकर्ते, उद्योगधुरीण आणि नवोन्मेषक भारतात दाखल झाले आहेत. या समिटमुळे भारत जागतिक पातळीवरील चर्चेच्या केंद्रस्थानी येणार आहे. तसेच, ग्लोबल साउथमधील देशांसाठी एआय क्षेत्रात मार्गदर्शक आणि प्रभावी आवाज म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याबरोबरच, तांत्रिक नेतृत्वाच्या जागतिक स्तरावरील अग्रगण्य मंचावर आपले स्थान अधिक मजबूत करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.(Al Impact Summit 2026)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आयोजित १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या पाच दिवसीय शिखर परिषदेचे अधिकृत उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मुख्य समिट १९ आणि २० फेब्रुवारीला होईल, तर पहिले तीन दिवस सत्रे, प्रदर्शने आणि कीनोट सेशन्स होतील मात्र. "मानवतेसाठी एआय, समावेशक वाढ आणि शाश्वत भविष्य" या थीमवर आधारित ही परिषद ग्लोबल साउथमधील पहिली मोठी एआय परिषद आहे. विशेष म्हणजे, ही परिषद पहिल्यांदाच विकसनशील देशांच्या क्षेत्रात आयोजित केली जात आहे.(Al Impact Summit 2026)

समिट आणि एक्स्पोचं स्वरूप
 
पंतप्रधान मोदी सोमवारी १६ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ वाजता, भारत मंडपम येथीलच 'इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो २०२६' चे उद्घाटन करतील. पंतप्रधान कार्यालयाने रविवारी सांगितले की, हा एक्स्पो प्रत्यक्ष कृतीत एआयचे राष्ट्रीय प्रदर्शन ठरणार आहे. जिथे धोरण आणि अंमलबजावणी यांचा संगम होईल, नवकल्पना व्यापक प्रमाणावर पोहोचतील आणि तंत्रज्ञानाचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचेल.(Al Impact Summit 2026)

भारत मंडपम येथे आयोजित हा एक्स्पो ७१,००० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रावर १० अखंड क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. यात जागतिक तंत्रज्ञान कंपन्या, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, केंद्र सरकारची मंत्रालये, राज्य सरकारे आणि आंतरराष्ट्रीय भागीदार सहभागी होत आहेत. लोक, ग्रह आणि प्रगती अशा तीन थीमॅटिक चक्रांनुसार ३०० हून अधिक क्युरेटेड प्रदर्शन पव्हेलियन आणि लाइव्ह डेमो सादर केले जाणार आहेत.(Al Impact Summit 2026)

आंतरराष्ट्रीय सहभाग आणि वैशिष्ट्ये

१३ देशांच्या पव्हेलियनमधून एआय इकोसिस्टममधील आंतरराष्ट्रीय सहकार्य दिसून येईल. यात ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, सर्बिया, एस्टोनिया, ताजिकिस्तान आणि आफ्रिकन देशांचा समावेश आहे. यात ६०० हून अधिक उच्च क्षमतेच्या स्टार्टअप्सचा सहभाग असून, त्यापैकी अनेक जागतिक स्तरावर आणि जनसंख्येच्या प्रमाणात एआय उपाय विकसित करत आहेत. कार्यक्रमात २.५ लाखांहून अधिक अभ्यागत, त्यात आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा समावेश अपेक्षित आहे. याशिवाय ५०० हून अधिक सत्रांमध्ये ३,२५० पेक्षा जास्त वक्ते आणि पॅनेलिस्ट सहभागी होतील.(Al Impact Summit 2026)

४५ हून अधिक देशांचे मंत्रिस्तरीय शिष्टमंडळ

या शिखर परिषदेत ४५ हून अधिक देशांचे मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. भारताने बीजिंगला औपचारिक निमंत्रण पाठवल्यानंतर चीनचे एक शिष्टमंडळही या परिषदेत उपस्थित राहणार आहे. सुंदर पिचाई (गुगल), सॅम ऑल्टमन (ओपनएआय), डारियो अमोदेई (अँथ्रोपिक), ब्रेड स्मिथ (मायक्रोसॉफ्ट), शंतनू नारायण (अॅडोब) आणि क्रिस्टियानो आमोन (क्वालकॉम) यांसारख्या आघाडीच्या जागतिक आणि भारतीय कंपन्यांचे ४० हून अधिक सीईओ या परिषदेत सहभागी होणार आहेत.(Al Impact Summit 2026)

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\