Sanjay Raut VS Sandeep Deshpande : गळ्यात गळे घालणाऱ्यांनी गळे पकडायला का सुरुवात केलीयं?

    13-Feb-2026
Total Views |
Sanjay Raut VS Sandeep Deshpande
 
मुंबई : (Sanjay Raut VS Sandeep Deshpande) "तुम करे तो रासलीला, हम करो तो कॅरेक्टर ढिला," अशी संजय राऊत यांची वागणूक बरी नाही, हे विधान आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचं. याला संदर्भ आहे तो चंद्रपूर महानगरपालिकेतील घडामोडींचा. चंद्रपूरमध्ये उबाठा गटाने घेतलेल्या भूमिकेवरून उबाठा गट आणि मनसेत जुंपली आणि संदीप देशपाडेंनी शेलक्या शब्दांत राऊतांचा समाचार घेतलाय.(Sanjay Raut VS Sandeep Deshpande)
 
खरंतर, चंद्रपूर महापालिकेतील तडजोडी आणि संजय राऊत यांची विधानं यातील विरोधाभासामुळे जनतेसह राजकीय नेतेही संभ्रमात आहेत. दुसरीकडे, चंद्रपूरातील झालेल्या घडामोडींमुळे मनसेला पोटदुखी सुरु झालीये. त्यामुळेच सध्या उबाठा गट आणि मनसेमध्येच तु तु मैं मैं सुरु असल्याचं दिसतंय. नेमकं प्रकरण काय आहे? मनसे नेत्यांचं म्हणणं काय? संजय राऊत काय म्हणाले? आणि एकूणच मनसे आणि उबाठा गटातील या वादाविषयी जाणून घेऊया.(Sanjay Raut VS Sandeep Deshpande)
 
गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर पदाचा तिढा सुटत नव्हता. काँग्रेसला इथे स्पष्ट बहुमत असूनही खा. प्रतिभा धानोरकर आणि आ. विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत वादामुळे त्यांना महापौर बसवता आला नाही. साहाजिकच या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला. उबाठा गटाने काँग्रेसला डच्चू देऊन भाजपला पाठींबा दिला आणि चंद्रपूर महापालिकेवर भाजपचा भगवा फडकला.(Sanjay Raut VS Sandeep Deshpande)
 
भाजपच्या संगीता खांडेकर यांची महापौरपदी निवड झाली असून उपमहापौर पदी उबाठा गटाचे प्रशांत दानव यांची निवड करण्यात आली आहे. विशेषत: बहुमत असूनही काँग्रेसवर विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की ओढवली. खरंतर, उबाठा गटाचा पाठींबा मिळवण्यासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत उबाठा गटाने चंद्रपूरात महापौर पदाची मागणी केली होती. मात्र, यात काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता उबाठा गटाच्या पाठींब्याने भाजपने चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापन केली असून सव्वा वर्ष भाजप आणि सव्वा वर्ष उबाठा गट असा फॉर्म्युला ठरल्याचं समजतं. भाजपच्या संगीता खांडेकर यांना ३२ मते तर काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना ३१ मते मिळाली आहेत. मात्र, या घडामोडींमुळे मनसेला पोटदुखी सुरू झाली.(Sanjay Raut VS Sandeep Deshpande)
 
हेही वाचा : Sanjay Shirsat : मराठी माणसासाठी लढणाऱ्यांची भूमिका आता बदलली- संजय शिरसाट 
 
खरंतर, उबाठा गटाच्या नगरसेवकांनी चंद्रपूरमध्ये भाजपला समर्थन देऊन त्यांचा महापौर विराजमानही झाला. मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वाधिक विसंगती दिसली ती संजय राऊत यांच्या भूमिकेत. एकीकडे चंद्रपूरमध्ये उबाठा गटाचे नगरसेवक प्रत्यक्ष भाजपला समर्थन देतात आणि भाजपचा महापौर विराजमान होतो, तर दुसरीकडे संजय राऊत सातत्यानं एकच दावा करत राहतात “उद्धव ठाकरे कोणत्याही परिस्थितीत भाजपला मदत करणार नाहीत.”(Sanjay Raut VS Sandeep Deshpande)
 
त्यामुळे जर राऊत यांचं वक्तव्य खरं असेल, तर मग चंद्रपूरमधील नगरसेवकांनी घेतलेला निर्णय हा उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेविरुद्धचा बंडखोर पवित्रा म्हणायचा का? म्हणजेच पक्षप्रमुखांचे आदेश स्थानिक पातळीवर पाळले जात नाहीत का? असाही प्रश्न राऊतांच्या विधानानं उपस्थित होतो. आणि जर नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेनुसारच निर्णय घेतला असेल, तर मग राऊतांची विधानं केवळ राजकीय पोपटपंची ठरतात. ही दुहेरी भूमिका उबाठा गटासाठी राजकीयदृष्ट्या धोकादायक तर ठरूच शकते शिवाय त्यांच्या विश्वासार्हतेलाही मोठा धक्का ठरतो.(Sanjay Raut VS Sandeep Deshpande)
 
संजय राऊतांच्या याच बोलघेवडेपणावर आता मनसेचे नेते तुटून पडले आहेत. "चंद्रपूरच्या बाबतीत संजय राऊत यांना अंधारात ठेवलं की, त्यांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली," असा सवाल संदीप देशपांडे यांनी केलाय. खरंतर, कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिवसेनेला पाठींबा दिल्यानं राऊतांचा तीळपापड झाला होता. त्यांनी मनसेवर टीकाही केली होती. मग आता मनसे नेते ही संधी कशी सोडणार? त्यामुळेच "तुमचे ते चंद्रपूर, आमचे ते डोंबिवली? वाह रे वाह" असं म्हणत राजू पाटील यांनीही राऊतांना डिवचलं.(Sanjay Raut VS Sandeep Deshpande)
 
वास्तविक आपण बोलतो काय? आणि आपल्या पाठीमागे काय घडतंय याची कल्पना संजय राऊतांसारख्या नेत्याला नसावी म्हणजे आश्चर्यच. संपूर्ण चित्र स्पष्ट असतानाही आणखी किती दिवस दुटप्पी आणि दुहेरी भूमिका घेणार? याचं उत्तर संजय राऊतांना शोधावं लागेल.(Sanjay Raut VS Sandeep Deshpande)