MLA Prasad Lad : बांग्लादेशी घुसखोरांना मुंबई बाहेर काढा- आमदार प्रसाद लाड
मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार प्रसाद लाड यांनी बेस्ट, पोलीस वसाहतसह विविध विषय सविस्तरपणे मांडले
13-Feb-2026
Total Views |
मुंबई : (MLA Prasad Lad) राज्याचे उपमुख्यमंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती ची बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली व शहराच्या विकासासंबंधी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.(MLA Prasad Lad)
मुंबई शहर अतिक्रमणमुक्त, सुरक्षित आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले ‘वर्ल्ड क्लास’ शहर बनवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी यांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.(MLA Prasad Lad)
बैठकीदरम्यान मुंबई शहरातील घुसखोर बांग्लादेशींना बाहेर काढण्याबाबत निर्णय घ्यावा यासाठी आमदार लाड यांनी प्रश्न उपस्थित केला. पूर्व द्रुतगती मार्ग (इस्टर्न फ्री वे) वर बांग्लादेशी घुसखोरांनी कुठेकुठे अतिक्रमण केले आहे, याची माहिती यावेळी लाड (MLA Prasad Lad) यांनी दिली.
या बैठकीत मुंबईतील सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला. वडाळा येथील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार व डागडुजीसाठी निधीची मागणी करण्यात आली होती. तसेच सायन येथील ऐतिहासिक किल्ला व तलाव यांच्या डागडुजी व सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत निधी देण्यास मान्यता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(MLA Prasad Lad)
त्याचप्रमाणे बेस्ट वसाहती आणि पोलीस वसाहतीचा प्रश्न, शहरातील विविध ठिकाणी असलेल्या शौचालयांची पुनर्बांधणी आणि दुरुस्तीचा मुद्दा देखील आमदार लाड यांनी उपस्थित केला.वार्षिक अर्थसंकल्पीय नियोजनाच्या अनुषंगाने विविध विषयांवर निधीची तरतूद करण्याची मागणी सादर करण्यात आली.(MLA Prasad Lad)