Amit Thackeray on Musical Road : मुंबईकरांना खरंच ‘याची’ गरज आहे का?, ‘जय हो’ गाणं का वाजवल?, अमित ठाकरेंना पडला प्रश्न

    13-Feb-2026
Total Views |
Amit Thackeray on Musical Road
 
मुंबई : (Amit Thackeray on Musical Road) मुंबई महानगरपालिकेचा कोस्टल रोडवरचा ‘म्युझिकल रोड’चा प्रयोग नक्कीच नवीन आहे, काहीतरी वेगळं आहे. तंत्रज्ञानाचा असा वापर केल्याबद्दल प्रशासनाचं अभिनंदन! पण मुंबईकरांना खरंच ‘याची’ गरज आहे का? ही मुंबईकरांची ‘बेसिक’ मागणी तरी होती का? रस्त्याचे इतके महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित ठेवून हा कसला अट्टाहास?, असा प्रश्न आता राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना पडला आहे.(Amit Thackeray on Musical Road)
 
ते म्हणाले, “खरंतर कोस्टल रोड म्हणजे रोजच्या ट्रॅफिकच्या गोंगाटातून जरा शांतता! काही दिवस हे कुतूहल म्हणून ठीक वाटेल, पण रोजच्या प्रवाशांसाठी हा केवळ ‘गोंगाट’ ठरणार नाही का? तसेच, गाडी चालवताना ड्रायव्हरचं लक्ष विचलित होण्याची शक्यता प्रशासनाने तपासली आहे का? आणि बरं, काही वाजवायचंच होतं, तर मग आपल्या मराठी मातीतलं गाणं का नाही?,” असेही ते म्हणाले आहेत.(Amit Thackeray on Musical Road)
 
“आपल्या महाराष्ट्राची ओळख सांगणारं एखादं मराठमोळं गाणं का नाही? ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ सारखं आपलं राज्यगीत किंवा स्वरसम्राज्ञी लता दीदींच्या आवाजामधील स्वरातील एखादं गाणं निवडलं असतं, तर अधिक अर्थपूर्ण झालं असतं! हा रस्ता मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे! मुंबईच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात आपल्या मराठी मातीचा आणि संस्कृतीचा सूर उमटला असता, तर तो अनुभव प्रत्येक मराठी माणसासाठी अधिक अभिमानाचा ठरला असता. पण पुन्हा एकदा आपण आपली ओळख विसरलो.”, अशी टीका त्यांनी केली आहे.(Amit Thackeray on Musical Road)
 
हेही वाचा : Ubatha Parbhani Dispute : परभणीत खान महापौरासाठी उद्धव ठाकरेंनी कसं चालवलं मुस्लीम कार्ड? 
 
“महत्त्वाचा प्रश्न हा की, या गोष्टी नेहमी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’लाच का सांगाव्या लागतात? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री स्वतःहून मराठी अस्मितेचा विचार का सुचत नाही? आपल्या भाषेच्या आणि संस्कृतीच्या सन्मानाची आठवण आम्हाला वारंवार सरकारला का करून द्यावी लागते? विकास हा व्हायलाच हवा, नवीन प्रयोगही घडायला हवेत; पण आपल्या संस्कृतीची जाण नसेल, तर तो विकास अपूर्ण आहे. त्यामुळे प्रयोग जरूर करा, पण ही कुणाची भूमी आहे आणि इथली संस्कृती काय आहे, याचं भान नक्की ठेवा!”, असेही अमीत ठाकरे म्हणाले.(Amit Thackeray on Musical Road)
 
कसा आहे भारतातील पहिला 'संगीत रस्ता'?
 
हंगेरी, जपान, दक्षिण कोरिया आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांच्या पावलावर पाऊल ठेवत भारतातही पहिल्यांदाच ‘संगीत मार्ग’ साकारण्यात आला आहे. मुंबईतील धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी मार्गाला हा वैशिष्ट्यपूर्ण सन्मान मिळाला आहे. या मार्गावर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विशेष संगीत पट्टे (मेलोडी रोड) बसविण्यात आले आहेत. वाहन या पट्ट्यांवरून विशिष्ट वेगाने गेल्यास ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ऑस्करविजेते ‘जय हो’ हे गाणे ऐकू येते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण प्रकल्प साकार झाला आहे.(Amit Thackeray on Musical Road)
 
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामार्गावरून प्रवास करत या अभिनव संगीत पट्ट्यांची अनुभूती घेतली. हंगेरीचे उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राहुल शेवाळे यांनी प्रत्यक्ष प्रवास करून संगीतमय रस्त्याचा अनुभव घेतला. वाहन चालवत असताना ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकू आली, हा वेगळाच आणि आनंददायी अनुभव असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.(Amit Thackeray on Musical Road)
 
मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या मुंबई किनारी रस्त्यावर नरिमन पॉईंट कडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तरमार्गिकेवर हा अभिनव प्रयोग साकारण्यात आला आहे. वरळीकडे जाणाऱ्या भूमिगत बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर दुभाजकाला लागून असलेल्या पहिल्या मार्गिकेवरून ५०० मीटर पुढे संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. या पट्ट्यांवरून ताशी ६० ते ८० किलोमीटर वेगाने वाहन नेल्यास वाहनात "जय हो" या गीताची धून ऐकू येते.(Amit Thackeray on Musical Road)
 
भूमिगत बोगद्यात वाहन असतानाच चालकांना संगीतमार्गाची माहिती व्हावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून ५०० मीटर, १०० मीटर आणि ६० मीटर अंतर आधीच संगीत मार्गाबाबतचे सूचनाफलक लावण्यात आले आहेत. आता ५०० मीटरचा संगीत रस्ता तयार झाला आहे. यामध्ये 'जय हो' ची धून वाजते आहे. मात्र इतरही धून वाजवल्या जाऊ शकतात. या मार्गाची सफलता आणि लर्निग यांचा विचार करून यामार्गावर संगीत रस्ता विस्ताराचा विचार केला जाईल.(Amit Thackeray on Musical Road)