Sovereign Gold Bonds: सुवर्ण रोख्यांतील व्यवहारांवर आता कर द्यावा लागणार!

    01-Feb-2026
Total Views |
 
Sovereign Gold Bonds
 
Sovereign Gold Bonds: जर तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स (SGB) अर्थात सरकारमान्य सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चिंताजनक बाब या अर्थसंकल्पात दिसून आली. २०२६-२७ या अर्थसंकल्पात झालेल्या घोषणेत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सुवर्ण रोख्यांना मिळणाऱ्या कैपिटल गेन टॅक्समध्ये दिल्या जाणाऱ्या सवलीतील नियमावली काटेकोर करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांना हा मोठा झटका मानला जात आहे. ज्यामुळे आता करमुक्त गुंवतणूकीचा फायदा गुंतवणूकदारांना मिळणे कठीण होणार नाही. (Sovereign Gold Bonds)
 
अर्थसंकल्पानुसार केवळ वैयक्तीक श्रेणीतील गुंतवणूदकार हे फक्त कॅपिटल गेन टॅक्सपासून मुक्त होणार आहेत. मात्र, त्यांनी कर्जरोखे हे थेट आरबीआयकडून विकत घेतलेले असावेत. दुसरे महत्वाचे म्हणजे जर आरबीआयकडून सुवर्णरोखे घेतले असतील तर एकूण आठ वर्षांच्या मुदतीपर्यंत त्यांची विक्री करता येणार नाही. तरच त्यांना पूर्णपणे करमुक्त मानले जाईल. अन्यथा विक्रीवर कर आकारला जाणार आहे. (Sovereign Gold Bonds)
 
गुंतवणूकदार तज्ज्ञांच्या मते, भांडवली बाजारातील गुंतवणूकदार ज्यांनी मुदत पूर्ण होईपर्यंत सुवर्ण रोख्यांची विक्री केलेली नाही, त्यांना हा मोठा दणका मानला जात आहे. जर सुवर्णरोखे मुदतीपूर्वी विक्री केले तर आता कर द्यावा लागणार आहे. ज्यामुळे सुवर्ण रोख्यांद्वारे करबचतीचा मार्ग आता बंद झाला आहे. सोन्याच्या भावात झालेल्या विक्रमीवाढीमुळे गुंतवणूकदारांना सुवर्ण रोख्यांचा पर्याय हा पारदर्शी आणि सुरक्षित वाटत होता. आता मात्र, या निर्णयामुळे अचानक गुंतवणूकदारांचे गणित बदलणार आहे. वारंवार शॉर्ट टर्म ट्रेडींगद्वारे करबचतीचा मार्ग म्हणून याकडे पाहिले जात होते. सरकारला या क्षेत्रात स्थिर आणि दीर्घकालीन गुंतवणूक अपेक्षित आहे. वारंवार होणाऱ्या व्यवहारांमुळे करबचतदारांच्या हातून हे सुवर्ण रोख्यांचे व्यवहार दीर्घकाळ होल्ड करणाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहेत. (Sovereign Gold Bonds)