कपिल शर्मा शो मधील ए आर रेहमान यांच्या सहभागावरून वरून नितेश राणे यांनी सुनावले
01-Feb-2026
Total Views |
मुंबई : ( Nitesh Rane ) दी कपिल शर्मा शो मधील ए आर रेहमान यांच्या सहभागावरून नेटफ्लिक्स आणि कपिल शर्मा यांना मंत्री नितेश राणे यांनी खडे बोल सुनावले आहेत.
आपल्या एक्स हँडलवरून रविवार दि.२ रोजी भाजपा नेते आणि मंत्री नितेश राणे म्हणतात, "कॉमेडी म्हटलं की नाव येतं कपिल शर्मा यांच, आणि द ग्रेट इंडियन कपिल शो ला देश-विदेशात मोठी लोकप्रियता मिळाली आहे. मात्र ए आर रेहमान यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे भारत, इतिहास आणि हिंदू समाजाच्या भावनांबाबत अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर त्यांना मोठ्या मंचावर स्थान देण्याच्या निर्णयाबाबत आम्ही तीव्र निषेध नोंदवतो."
"मनोरंजनाचे स्वातंत्र्य मान्य आहे, परंतु जनभावना, हिंदू समाजाच्या भावनांचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मता यांना प्राधान्य दिले गेले पाहिजे. नेटफ्लिक्स व शो निर्मात्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करून समाजातील संवेदनशीलतेची दखल घ्यावी. कॉमेडी स्वागतार्ह आहे, पण भारताची अखंडता, सांस्कृतिक अस्मिता आणि हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही."
ए आर रेहमान यांच्या काही दिवसापूर्वीच्या वादग्रस्त विधानामुळे भारतीयांच्या आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता त्यांच्या शो मधील सहभागावरून मनोरंजनाच्या नावाखाली हिंदुत्वाशी तडजोड केली जाणार नाही असे मत यातून नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.