Beed Crime : बीडच्या माजलगावमध्ये एटीएसची मोठी कारवाई! ४ कोटींचा बेकायदेशीर निधी जप्त; लातूर कनेक्शन उघड

चौघांवर गुन्हा दाखल, दोघेजण ताब्यात

    09-Jan-2026   
Total Views |

Beed Crime

मुंबई : (Beed Crime) बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामध्ये धार्मिक कार्याच्या खाली बेकायदेशीर निधी जमवण्याच्या आरोपावरुन चार जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. अहिल्यानगरमधील वैध ट्रस्टचा नोंदणी क्रमांक चोरी करून बनावट ट्रस्ट तयार करुन हा निधी गोळा केला जात होता. बेकायदेशीरपणे गोळा केलेला हा निधी देशविघातक दहशतवादी संघटनांना पुरवला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.(Beed Crime)

नेमके प्रकरण काय?

अहिल्यानगरच्या फैजान ए-कन्झूल इमान या ट्रस्टचा नोंदणी क्रमांक वापरून गुलजार ए-रझा ट्रस्टच्या नावाने लातूरमध्ये पाच वेगवेगळी खाते उघडून धार्मिक कामाच्या नावाखाली चार कोटी ७३ लाख ६७ हजार ५०३ रुपयांचा निधी जमा करण्यात आला. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने बीड जिल्ह्यातील माजलगाव शहराजवळील पात्रुड गावात गुरुवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास छापा मारून दोघांना ताब्यात घेतले. तर चार जणांविरुद्ध माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईबाबत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दुजोरा दिला आहे.(Beed Crime)

इमरान कलीम शेख (सदर बाजार, अंबाजोगाई), मुज्जम्मिल नूर सय्यद (सत्तार गल्ली पात्रुड), अहमदुद्दीन कैसर काझी (रोजा मोहल्ला, केज) व तौफीक जावेद काझी, अशी गुन्हा दाखल झालेल्या चार संशयितांची नावे आहेत. यातील मुज्जम्मिल नूर व अहमदुद्दीन काझी या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.(Beed Crime)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\