मुंबई : ( Shankar Masavkar ) ज्येष्ठ देशभक्त समाजसेवक शंकर देवजी मासावकर यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांचे समाजकार्यात भरीव योगदान होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे ते आजीवन सदस्य होते. त्यामुळेच त्यांच्या निधनाने मुंबईतील समाजिक क्षेत्रात शोककळा पसरली.
शंकर देवजी मासावकर केंद्रीय टपाल कामगार सेनेचे माजी उपाध्यक्ष होते. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, गिरणी कामगार मोर्चा, कामगार विरोधी धोरण, मुंबईतील स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचे शिवराय संचलन तसेच अन्य सार्वजनिक मेळाव्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकही होते. १९६५ च्या भारत पाक युध्दावेळी धान्याची साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्या व्यापारांना धडा शिकावण्यात त्यांची भूमिका अग्रेसर होती. त्यांनी सम्राट विकास मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रीय सण आणि उत्सव साजरे करणे, स्पर्धा शिबिरे भरवणे आदीमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा पुरस्काराने तसेच समाजसेवा देशभक्ती गौरव पुरस्कार १९८०', 'सामाजिक कार्याचा देशभक्ती पुरस्कार १९८२, पु. भा. भावे स्मृती समिती, मुंबई, 'कृतिशील अनुयायी पुरस्कार १९९९' अशा विविध संस्थांच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.