(Tejinder Singh Tiwana) मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अवघे काही दिवस शिल्लक असून सर्वच पक्षांच्या प्रचाराला जोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा वॉर्ड क्रमांक ४७ चे अधिकृत उमेदवार तेजिंदर सिंग तिवाना यांच्याशी दै. मुंबई तरूण भारतने साधलेला हा संवाद...
१) वॉर्ड क्रमांक ४७ मधून तुम्हाला भाजपतर्फे अधिकृत उमेदवारी मिळाली आहे, काय भावना आहेत?
- आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी आमच्यासारख्या युवकांवर विश्वास ठेवून आम्हाला संधी दिली ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही युवक चांगले काम करून दाखवणार असा त्यांना विश्वास आहे. (Tejinder Singh Tiwana)
२) या वॉर्डमध्ये कोणत्या अशा प्रमुख समस्या आहेत ज्या तातडीने सोडवणे गरजेचे आहे?
- वॉर्ड क्रमांक ४७ मध्ये राजनपाडा हा परिसर आहे. याठिकाणी पाण्याची मोठी समस्या आहे. इथे निवडून आल्यानंतर तिथल्या लोकांना २४ तास पाणी कसे मिळणार यादृष्टीने काम करण्याचे माझे व्हिजन आहे. याव्यतिरिक्त इथे एक नवीन रुग्णालय हवे आहे. त्यासाठी मागच्या सहा महिन्यांपासून केंद्रीय मंत्री तथा खासदार पीयूष गोयल यांच्यामार्फत आमचे प्रयत्न सुरु आहे. लवकरच हे नवीन रुग्णालय उभारले जाईल, असा विश्वास आहे. (Tejinder Singh Tiwana)
३) तुम्ही आतापर्यंत इथले कोणते प्रश्न मार्गी लावले आहेत?
- मी आतापर्यंत इथले छत्रपती शिवाजी महाराज मनोरंजन मैदान, महाराणा प्रताप मैदान, कॅप्टन विनायक गोरे मैदान ही मैदाने युवकांसाठी विकसित केले आहेत. अनेक ठिकाणी सौलार लाईट लावलेत. तसेच युवकांसाठी रोजगार मेळावे आणि मार्गदर्शन शिबिरे राबवली आहेत. (Tejinder Singh Tiwana)
४) इथे लॅण्ड जिहादचा खूप मोठा प्रश्न आहे. त्याकडे कसे बघता?
- मालाडमधील मालवणी परिसरात तिथल्या लोकप्रिय आमदारांच्या माध्यमातून बांग्लादेशी आणि रोहिंगे यांना आणून त्यांना तिथे स्थायिक करण्याचे काम केले जात आहे. परंतू, मी निवडून आल्यानंतर युवकांची टीम बनवणार आणि एक एक बांग्लादेशी-रोहिंगे शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. (Tejinder Singh Tiwana)
५) रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी, अनधिकृत झोपडपट्टी आणि मोकळ्या जागांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कोणती पावले उचलणार आहात?
- वॉर्ड क्रमांक ४७ साठी मी एक ब्लू प्रिंट तयार केली आहे. यामध्ये रस्त्यावरील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्यामुळे रस्त्यांचे आकारमान वाढेल. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठीही प्रयत्न करेल. मी एक तरुण उमेदवार असून आमचा परिसर विकसित करण्याचे माझे व्हिजन आहे. त्यामुळे निवडून आल्यावर येथील अनधिकृत झोपडपट्टी आणि मोकळ्या जागांवरील अतिक्रमण हटवण्यास माझे प्राधान्य असेल. (Tejinder Singh Tiwana)
६) महिला सुरक्षेसाठी कोणती पावले उचलणार? ड्रग्सविरोधात कोणते उपक्रम राबवणार?
- महिला सुरक्षेसाठी कोपऱ्याकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरा लावून त्याच्या फुटेजचे प्रसारण थेट पोलिस स्टेशनमध्ये होण्याची व्यवस्था करणार आहे. तसेच ज्याठिकाणी लाईट्सची कमतरता आहे, तिथे सोलार लाईट्स लावणार आहेत. मी ड्रग्सविरोधात उपक्रम राबवत असून यापुढेही माझी ही लढाई कायम सुरु राहील. (Tejinder Singh Tiwana)
७) तुम्हाला मतदारांनी संधी द्यावी, यासाठी काय आवाहन कराल?
- मी एक सुशिक्षित युवक असून माझ्याकडे अनुभव आहे. वयाच्या १३ व्या वर्षापासून माजी नगरसेवक असलेल्या माझ्या आई आणि वडीलांकडून मी शिकत आलो आहे. त्यामुळे वॉर्ड क्रमांक ४७ चा कायापालट करून दाखवणारा एक सुशिक्षित तरुण उमेदवार आहे, हे लोकांना सांगून मी त्यांचे आशीर्वाद घेत आहे. येत्या पाच वर्षात वॉर्ड ४७ हा मुंबईत सर्वोत्तम असेल, असा मला विश्वास आहे. (Tejinder Singh Tiwana)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....