संजय राऊत यांना वसुलीची सवय आहे - नवनाथ बन

    07-Jan-2026
Total Views |
Navnath Ban
 
मुंबई : ( Navnath Ban ) "इतरांच्या घोटाळ्यांवर संजय राऊत यांना बोलण्याचा कवडीचाही अधिकार नाही.कारण पैसे खाण्याची जास्त सवय राऊत यांना आहे. कोविड, खिचडी घोटाळा ज्यांनी केला त्या राऊत यांना लोकांकडून पैसे वसुलीची सवय झाली आहे." अशी टीका भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवार दि.७ रोजी केली.
 
"महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हे जनतेला माहित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक डाग नाही आहे , तुमच्याकडे असा नेता आहे का ? मुख्यमंत्री मुंबईची सेवा करण्यात व्यस्त असतात. मुंबई देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे.भ्रष्टाचाराच्या गप्पा राऊत यांनी करू नयेत मुंबई महापालिकेतील पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने राऊत असे वायफळ बोलत आहेत."असेही बन यांनी सुनावले.
 
"राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या ज्या ज्या मुलाखती घेतल्या त्यात उद्धव ठाकरेंना जागतिक नेते करण्याचा प्रयत्न केला आहे. आता पण त्यांना उद्धव ठाकरे यांचा ट्रम्प, पुतीन यांच्यासोबत उदो उदो करायचा आहे.पण घरात बसून जागतिक नेतृत्व करता येत नाही हे राऊत यांनी लक्षात ठेवावे.त्यामुळे ही धुरंदर नाही तर दरिंदर आणि डकेतांची मुलाखत आहे. खरे धुरंधर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत अन् डकेत कोण आहेत हे सगळ्यांना माहीत आहे." असेही बन यांनी स्पष्ट केले.
 
हेही वाचा : राऊत यांची भाषा त्यांच्या विचारांची झलक आहे - आमदार चित्रा वाघ
 
"उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री स्वतः सांगतील की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत. स्वतः शरद पवार यांनी देखील स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल क्रांतीसुर्य असे चांगल वर्णन केलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान अम्ही कधीही सहन करणार नाही." असेही बन म्हणाले.
 
"उद्धव ठाकरे स्वतः घरात आहेत.राऊत पत्रकार परिषद सोडून काही करीत नाहीत. जनतेची सेवा करणे हे भाजपाच्या रक्तात आहे. सेवा करायची हा भाजपाचा धर्म आहे तर मेवा खायचा हा उबाठाचा गटाचा धर्म आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या दारात जातात. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी किती सभा केल्या आहेत." असा सवाल बन यांनी केला.