राज्यात सर्वाधिक वाघ असणाऱ्या तालुक्यात खाणकामास मंजूरी ते नवे वन्यजीव अभयारण्य

    07-Jan-2026
Total Views |
brahmapuri tiger corridor


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या असणाऱ्या ब्रम्हपूरी वनपरिक्षेत्रात खाणकाम करण्यास राज्य वन्यजीव मंडळाने मंगळवार दि. ६ जानेवारी परवानगी दिली आहे (brahmapuri tiger corridor). खाणकामासाठी परवानगी देण्यात आलेले क्षेत्र हे व्याघ्र भ्रमणमार्गाचा भाग आहे (brahmapuri tiger corridor). मंडळातील काही तज्त्रांचा विरोध डावलून हा निर्णय घेण्यात आला (brahmapuri tiger corridor). मात्र, याचवेळी खाणकामासाठी वळते केल्या जाणाऱ्या वनक्षेत्राइतक्याच आाकाराच्या क्षेत्रावर नवे अभायरण्य तयार करण्यात येणार घोषणाही करण्यात आली आहे. (brahmapuri tiger corridor)
 
 
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये प्रामुख्याने मानव-वाघ संघर्ष पाहायला मिळतो. २०२२ सालच्या व्याघ्र गणनेनुसार ब्रम्हपूरीमध्ये वाघांची संख्या ५३ आहे. मात्र, ती याहूनही अधिक असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ब्रम्हपुरी तालुक्यातील लोहडोंगर गावापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावर खाणकामास परवानगी देण्यात आली आहे. हा डोंगर काचेपार राखीव जंगलात येतो. ब्रम्हपूरी वन विभागातील कक्ष क्र. ४३९ मध्ये प्रस्तावित असणाऱ्या या खाण प्रकल्पासाठी ३५ हेक्टर वनक्षेत्र वळते करण्यात येणार आहे. या क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालात याठिकाणी पाच वाघ असल्याचे म्हटले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड पवनी कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यादरम्यानचा व्याघ्र भ्रमणमार्ग या भागातून जातो.
 
 
महत्त्वाचे म्हणजे खाणकामासाठी वळते करण्यासाठी आलेल्या क्षेत्रालगतच्या गावांमध्ये व्याघ्र-मानव संघर्षाची समस्या आहे. वाघांच्या हल्ल्यात ब्रम्हपूरी तालुक्यात अनेक लोकांना आपल्या जीव गमवावा लागणार आहे. अशा परिस्थितीत याठिकाणी खाणकाम झाल्यास अधिवासाच्या कमतरतेमुळे संघर्षाच्या परिस्थितीत वाढ होईल, असे मत स्थानिक वन्यजीव अभ्यासक सुरेश चोपणे यांनी मांडले आहे. ३५ हेक्टरचा हा भााग खुल्या लोहखनिज खाणीसाठी देण्यात आला असला तरी, घोडाझरी टू अकारा याठिकाणी ३५ हेक्टरचे नवे वन्यजीव अभयारण्य घोषित करणार असल्याची भूमिका राज्य सरकराने घेतली आहे. रानम्हशींसाठी संवर्धित करण्यात आलेले कोलामार्क संवर्धन राखीव क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्यासंदर्भातही राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. अशावेळी अभयारण्यासंदर्भातील प्रस्तावात फेरबदल करुन पुढच्या बैठकीत पुन्हा हा प्रस्ताव मांडण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी यांनी दिली.