BMC Elections : मुंबई महापालिका लोगोतील ‘यतो धर्मस्ततो जय:’ अर्थ, इतिहास आणि आजची निवडणूक
06-Jan-2026
Total Views |
मुंबई : (BMC Elections) मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे सर्वत्र प्रचार आणि भेटींवर उमेदवारांचा जोर वाढला आहे. मुंबई महापालिका म्हटले की आपल्यासमोर उभी राहते ती तिची भव्य इमारत आणि त्यावरील लोगो. महापालिका इमारतीच्या लोगोमध्ये एक बोध वाक्य आहे. जो संस्कृत श्लोक आहे 'यतो धर्मस्ततो जय:' याचा अर्थ आहे 'जिथे धर्म आहे तिथे विजय होईल' या श्लोकाचा महाभारतात देखील उल्लेख आहे. श्री कृष्णाने अर्जुनाला रणांगणावर जे द्यान दिले ते म्हणजेच भगवद्गीता. ज्या ठिकाणी तुम्ही आहात तिथली कर्तव्य करताना तुमची भुमिका काय असावी याचे अर्जुनाला श्री कृष्णाने सांगितलेले सार.महाभारत म्हणजे याच सर्व संवाद रुपी गोष्टी. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या चिन्हात पण या श्लोकाचा उल्लेख आढळतो. भगिनी निवेदिता यांनी देशाच्या ध्वजाचे जे प्रारूप तयार केले होते त्यातही या श्लोकाचा उल्लेख होता. तसेच जयपूरच्या अल्बर्ट हॉल म्युझियम मध्येही हा श्लोक आहे. श्लोकाचा अर्थ खूप मोठा असून निवडणुकी संदर्भात अर्थ पाहिला तर ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले त्यांच्यासाठी प्रामाणिक काम करणे. त्यांच्या समस्या सोडवणे आणि त्यांच्यासाठी विकासात्मक धोरणे ठरवणे हा अर्थ होईल. मतदारांच्या बाबतीत अर्थ घेतला तर प्रत्येकाने मतदान करणे हा निवडणूक धर्म आहे. निवडणूक प्रशासनाने मतदार जागृती मोहीम घेतली आहे.यात 'करा मतदान, सांगतेय संविधान', ' एक मत आपको मतदार बनता है ' अशी आवाहने जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी केली जात आहेत. यावरून मतदार आणि उमेदवार या दोघांनी आपली कर्तव्य केली पाहिजेत हे प्रतीत होते. (BMC Elections)
यावरच इमारतीच्या लोगो मध्ये एका भागात गिरण्या आणि जहाज आहेत ,दुसऱ्या भागात प्रार्थना स्थळ आहेत. गिरण्यावरून ही आर्थिक राजधानी म्हणजेच औद्योगिक राजधानी प्रतीत होते तर जहाजावरून प्रवास प्रतीत होतोय.यावरून मुंबईचा कारभार करताना सर्वांगीण विचार आवश्यक आहे. गेट वे ऑफ इंडियाचा सुद्धा उल्लेख यात असून जे मुंबईच्या सौंदर्यात भर घालते. (BMC Elections)
मुंबई महापालिका इमारत ही देशातील जुन्या इमारतींपैकी एक मानली जाते.ही इमारत जागतिक वारसा यादीत सुद्धा येते. इमारत गॉथिक शैलीतील असून चार मजली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात ही इमारत मोठ्या दिमाखात मुंबईचा गौरवशाली इतिहास सांगत उभी आहे.१८८९ ला इमारतीचे बांधकाम सुरू झाले आणि १८९३ ला पूर्ण झाले. डिझाइन जरी ब्रिटीशांनी केले असले तरी बांधकाम कंत्राट एका भारतीयानेच घेतले होते. इमारतीतील ६८ फुटांच्या भव्य सभागृहात मुंबईची विकसनिती ठरवण्याचे काम लोकांतून निवडून आलेले प्रतिनिधी करीत असतात.यावरून या निवडणुकीत याचा विचार आवर्जून केला जावा. (BMC Elections)