Bhaiyyaji Joshi : दुर्गानंदजजींच्या जगण्यावागण्यात संघ होता : भैयाजी जोशी

Total Views |
 
Bhaiyyaji Joshi
 
मुंबई : (Bhaiyyaji Joshi) संघाचे काम मशाल फेरी काढून नाही तर 'एक दीप से जला दुसरा' अशाच पद्धतीने वाढले आहे. संघ समजून घेण्यासाठी संघातील माणसे समजून घेणे आवश्यक आहे. संघातील असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे दुर्गानंद नाडकर्णी होते. त्यांच्या जगण्यावागण्यात संघ होता, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश तथा भैयाजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी व्यक्त केले.
 
हेही वाचा : कृषिक्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे यश 
 
संघाचे ज्येष्ठ प्रचारक दुर्गानंद नाडकर्णी यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मुंबई महानगराच्या वतीने सोमवारी सायंकाळी लोअर परळ येथील यशवंत भवन येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भैयाजी जोशी (Bhaiyyaji Joshi) बोलत होते.
 
ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचे इतके पैलू असतात की जवळच्या व्यक्तींना ते समजत नाहीत. आज या सभेत दुर्गानंदजींच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समजून आले. यावेळी दुर्गानंदजींना आदरांजली वाहण्यासाठी शेकडो स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी अनेक जण त्यांच्या आठवणीत भावुक झाले. (Bhaiyyaji Joshi)
  

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.