केडीएमसी निवडणूकीच्या जनजागृतीसाठी महापालिकेतर्फे विविध स्वीप उपक्रमांचे आयोजन

    04-Jan-2026   
Total Views |
Voter Awareness Campaign
 
कल्याण : ( Voter Awareness Campaign ) केडीएमसी निवडणूकीच्या जनजागृतीसाठी महानगरपालिकेने अनेक स्वीप उपक्रमांचे आयोजन महापालिका परिक्षेत्रात केले आहे. त्याअंतर्गत कल्याण पश्चिम आणि ग्रामीण परिसरात विदयार्थ्यांमार्फत जनजागृतीपर पथनाटयांचे आयोजन करण्यात आले.
 
जनमानसात मतदानाबाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी या दृष्टीकोनातून शनिवारी कल्याण पश्चिम येथील नागरिकांचा जास्त वावर असलेल्या सिटी पार्क मध्ये विविध ठिकाणी तसेच वसार ,भाल बस थांबा परिसर, चक्कीनाका परिसर येथे जे.सी.एस मराठी हायस्कुल, प्रगती विदयामंदिर प्राथमिक शाळा यांच्या विदयार्थ्यांमार्फत जनजागृतीपर पथनाटयांचे आयोजन करण्यात आले. यावेळी कल्याण डोंबिवली महागनरपालिकेचे स्वीपचे नोडल अधिकारी संजय जाधव, सहा.नोडल अधिकारी विजय सरकटे, जे.सी.एस शाळेचे मुख्याध्यापक गणेश कोळेकर व प्रगती विदयामंदिर प्राथमिकचे मुख्याध्यापक संतोष माने तसेच इतर सह शिक्षक उपस्थित होते.
 
हेही वाचा : हिंदुत्वाला तिलांजली दिल्यानेच उद्धवजीपासून उद्धवमामू पर्यंतचा प्रवास आहे - अमीत साटम
 
इतकेच नव्हे तर महापालिकेच्या विविध शाळांमध्ये आकर्षक रंग रांगोळीच्या माध्यमातून, फुलांच्या माध्यमातून तसेच हातांवर रेखाटलेल्या मेंदीच्या माध्यमातून अनोख्या पध्दतीने मतदानाची जनजागृती करण्यात आली.