मुंबई : ( Shubha Raul ) उबाठाच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी पक्षाला राम राम करीत शिव आरोग्य सेना अध्यक्षपद अन पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केला आहे. ठाकरेंची साथ सोडून त्या भाजपाच्या वाटेवर असल्याचे समजते.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अवघे १० दिवस बाकी असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ला हा मोठा धक्का मानला जात आहे.यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या अंतर्गत असंतोषाच्या चर्चांना उधाण आले आहे.
राजीनामा दिल्यानंतर शुभा राऊळ यांनी भाजप नेते तथा राज्याचे मंत्री आशिष शेलार यांची मुंबईतील आमदार प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे शुभा राऊळ यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. महायुतीच्या प्रचारात त्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.