पीओके भारताचा अविभाज्य भाग; जम्मू-काश्मीर न्यायालयाचे प्रतिपादन

Total Views |
Jammu and Kashmir Court
 
मुंबई : ( Jammu and Kashmir Court ) जम्मू आणि काश्मीरच्या न्यायालयाने पाकव्याप्त काश्मीरबाबत एक महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट निरीक्षण नोंदवले आहे. एका खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, पीओके हा भारताचा अविभाज्य भाग आहे. एखाद्या व्यक्तीच्या परदेशी नागरिकत्वाचे किंवा बेकायदेशीर प्रवेशाचे ठोस आणि विश्वासार्ह पुरावे सादर केल्याशिवाय तेथून प्रवास करण्याच्या आरोपांवर आधारित परदेशी कायदा लागू केला जाऊ शकत नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद मकबूल राथेर याने दोन दशकांपूर्वी पीओकेमध्ये प्रवास केला, शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतले, लग्न केले आणि नंतर वैध कागदपत्रांशिवाय त्याची पत्नी परवीन अख्तर आणि मुलांसह जम्मू आणि काश्मीरला परतला. ऑगस्ट २०१२ मध्ये पोलिसांनी शत्रू एजंट अध्यादेश आणि परदेशी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
 
हेही वाचा : Ajit Pawar : "दादा... कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय...", रोहित पवारांची भावनिक पोस्ट
 
या घटनेमध्ये आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला असल्याचे न्यायालयाने सांगितले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटले की, आरोपीने बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली, शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतले किंवा परदेशी कायद्याचे उल्लंघन केले हे सिद्ध करण्यात सरकारी वकील पूर्णपणे अपयशी ठरले. सरकारी वकीलांनी न्यायालयात प्रवासाचे कोणतेही रेकॉर्ड, सीमा ओलांडण्याचे तपशील, गुप्तचर माहिती सादर केली नाही.
 
आरोपींची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने सांगितले की, पीओके हा पाकिस्तानचा भाग नाही. केवळ तिथे जाऊन आला म्हणून एखाद्या व्यक्तीला परदेशी मानले जाऊ शकत नाही, कारण तो भाग बेकायदेशीर पाकिस्तानच्या कब्जाखाली असला तरी भारताचा भाग आहे.
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.