मुंबई : (Kerala) केरळमधील (Kerala) पलक्कड शहरात एक महिला अचानक आयएमए जंक्शनजवळील वर्दळीच्या बीजी रोडच्या मध्यभागी नमाज पठण करायला बसली, ज्यामुळे वाहतूक काही काळासाठी थांबली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ही महिला रस्त्यावर बसली आणि दोन्ही बाजूंनी वाहने जात असतानाही प्रार्थना करू लागली. अनेक वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी तिला सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने त्यांना विरोध केला.(Kerala)
यानंतर स्थानिक नागरीकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली असता, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून साउथ सिटी पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला ताब्यात घेतले. महिलेने पोलिसांना सांगितले की तिच्या कृतीचा उद्देश कौटुंबिक मालमत्तेच्या वादाकडे लक्ष वेधणे होता. घरातील मालमत्तेच्या वादाबद्दल तिचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि मालमत्तेच्या वादात न्याय मिळावा यासाठी रस्त्याच्या मधोमध प्रार्थना केली.(Kerala)
पोलिसांनी सांगितले की, तिला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यानंतर लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात आली. घटनेची सविस्तर चौकशी केल्यानंतर महिलेचे वय ६० हून अधिक असल्याने गुन्हा दाखल न करता नातेवाईकांना बोलावून सोडून देण्यात आले.(Kerala)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.