Bangladesh Hindu Resettlement : बांगलादेशातील ९९ हिंदू कुटुंबांचे कानपूर येथे पुनर्वसन

योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Total Views |
Bangladesh Hindu Resettlement
 
मुंबई : (Bangladesh Hindu Resettlement) बांगलादेशातून विस्थापित झाल्यानंतर उत्तर प्रदेश राज्यात राहणाऱ्या हिंदू बंगाली कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या(Bangladesh Hindu Resettlement) संदर्भात योगी आदित्यनाथ सरकारने एक मोठा आणि मानवतावादी निर्णय घेतला आहे. बांगलादेशातून विस्थापित झालेल्या ९९ हिंदू बंगाली कुटुंबांचे कानपूर जिल्ह्यातील भैनसाया आणि ताजपूर तारासोली येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे.(Bangladesh Hindu Resettlement)
 
मेरठ जिल्ह्यातील मवाना तालुक्यात नांगला गोसाई गावामध्ये ही कुटुंबे सध्या तलावाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे राहत आहेत. सरकार आता तलावाचा परिसर रिकामा करेल आणि भैनसाया व ताजपूर तारासोली येथे या कुटुंबांचे औपचारिक पुनर्वसन करेल. प्रत्येक कुटुंबाला अर्धा एकर जमीन वाटप केली जाणार आहे, ज्यामुळे त्यांच्या कायमस्वरूपी निवासस्थानाची समस्या सुटेल.(Bangladesh Hindu Resettlement)
 
हेही वाचा : Kerala : केरळमधील एका महिलेकडून रस्त्याच्या मधोमध नमाज पठण  
 
भैनसाया गावात पुनर्वसन विभागाच्या मालकीच्या ११.१३७५ हेक्टर जमिनीवर ५० कुटुंबांना घरे दिले जातील. ताजपूर तारासोली गावात उर्वरित ४९ कुटुंबांचे १०.५३० हेक्टर जमिनीवर पुनर्वसन केले जाईल. ही पुनर्वसित जमीन भाडेतत्वावर दिली जाणार आहे, ज्यामुळे विस्थापितांना निवाऱ्याची सोय होईल.(Bangladesh Hindu Resettlement)
 
९० वर्षांपर्यंतच्या भाडेतत्वाची तरतूद
 
निर्वासितांना वाटप करण्यात येणारी जमीन ३० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर दिली जाईल. या भाडेतत्वाचे प्रत्येकी ३० वर्षांसाठी नूतनीकरण करण्याची तरतूद देखील आहे. नियमांनुसार जास्तीत जास्त ९० वर्षांपर्यंत करार असू शकतो.(Bangladesh Hindu Resettlement)
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.