Sahitya Sammelan : साताऱ्यातील शाळांनी धरली साहित्य संमेलनाची वाट!

    03-Jan-2026   
Total Views |
 
Sahitya Sammelan
 
सातारा : (Sahitya Sammelan) शतकापूर्तिकडे वाटचाल करणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणात वाचकांचे लेखकांची तसेच प्रकाशकांची मांदियाळी यावेळी अनुभवायला मिळाली. मात्र त्याचबरोबर एक महत्त्वाचा घटक यावेळी संपूर्ण संमेलन स्थळी वावरत होते ते म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी. या विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना या संमेलनामध्ये घेऊन येण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी महत्त्वपूर्ण योगदान नोंदवले आहे. (Sahitya Sammelan)
 
तासगाव या छोट्याशा गावात वाचन संस्कृती म्हणावी तशी रुजलेली नाही. या गावातील लोकांना वाचनाचे महत्व कळल्यास वाचनाची आवड ते पुढील पिढीत प्रवाहित करू शकतील. या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तासगावचे शिक्षक संदीप मोहिते यांनी संमेलनाआधी पालकांची सभा घेत संमेलनाविषयी माहिती दिली. मुले संमेलनात सहभागी झाल्यास त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण होऊ शकेल ज्या योगे त्यांची सर्वांगिण प्रगती होईल हा संदेश त्यांनी पालकांपर्यंत पोहोचविला. मोहिते यांची विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयीची कळकळ समजून घेऊन पालकांनी या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला. यातूनच तासगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांसह मोठ्या संख्येने संमेलनस्थळी उपस्थिती लावत संमेलनाविषयी जाणून घेतले. (Sahitya Sammelan)
 
हेही वाचा : Vinod Kulkarni : साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला! 
 
वाचन संस्कृती वाढावी, मुलांना पुस्तकांची गोडी लागावी, ज्या योगे त्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल ही तळमळ ग्रामीण भागातील शिक्षकांमध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे, ही बाब मराठी भाषा प्रवाही राहण्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे. संमेलनस्थळी मुले एकत्रित येऊन आपआपली आवडती पुस्तके वाचत होती. त्यांच्या डोळ्यातील जिज्ञासा, उत्सुकता सकारात्मकतेचा सुगंध संमेलन स्थळावर पसरवित होती. पुस्तकांमध्ये रमलेली मुले पाहून संमेलनाला भेटी देणारे नागरिक कौतुकाने हे दृश्य न्याहाळत होते. सातारा शहरात झालेल्या संमेलनामुळे जिल्ह्यातील विविध शाळांतून विद्यार्थ्यांना साहित्याचे दालन खुले झाले आहे हा संमेलनाचा सकारात्मक प्रभाव आहे असे विश्वासार्ह चित्र निर्माण झाले आहे. (Sahitya Samelan)
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.