उद्धव ठाकरे यांची नीती ममदानी प्रमाणेच - अमीत साटम
03-Jan-2026
Total Views |
मुंबई : ( Amit Satam ) "उद्धव ठाकरे यांची नीती ममदानी यांच्याप्रमाणेच असून, देशद्रोहाच्या गुन्ह्यात कैद उमर खलिद ज्याने 'देश तेरे तुकडे होंगे इन्श अल्ला इन्श अल्ला' अशा घोषणा दिल्या होत्या त्याचे समर्थन महापौर जोहरान ममदानी न्यूयॉर्क मध्ये बसून जशा पद्धतीने करीत आहेत.मी त्यांना सांगू इच्छितो की भारतातील अंतर्गत गोष्टीत त्यांनी नाक खुपण्याची गरज नाही आहे. उद्धव ठाकरे मुंबईत ममदानी प्रमाणेच नीती वापरत आहेत.पण आम्ही हा डाव यशस्वी होऊ देणार नाही.हीच ती खान मानसिकता पण आम्ही मुंबईचे मॅमडनायझेशन होऊ देणार नाही. आम्ही मुंबईचा रंग बदलू देणार नाही." असे प्रतिपादन भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी केले.
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यानी भारतातील तुरुंगात बंद असलेल्या उमर खलिदला पत्र लिहिले होते.त्यावर अमीत साटम यांनी प्रतिक्रिया दिली. साटम यांनी ट्विटर वर याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.तसेच ते पत्रही ट्विट केले होते.