मुंबई : ( 20th National Neurotherapy Conference ) डॉ. लाजपत राय मेहरा यांच्या न्युरोथेरपीची जागतिक महासंघ व आरोग्य भारती यांच्या संयुक्त विद्यमाने २० वे राष्ट्रीय न्युरोथेरपी अधिवेशन २-४ जानेवारी २०२६ या कालावधीत रामभाऊम्हाळगीप्रबोधिनी, उत्तन येथे संपन्न होत आहे. या शैक्षणिक कार्यशाळेचे शीर्षक 'न्युरोथेरपी (निदानातील उत्कृष्टता)' असे असून यामध्ये विविध विषयांवरील वैज्ञानिक व्याख्याने तसेच न्युरोथेरपीद्वारेयशस्वीरित्या उपचार करण्यात आलेल्या आजारांवरील चर्चासत्र होणार आहे.
या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात प्रमुख अतिथी आरोग्य भारती राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. अशोक कुमार वार्ष्ण्येय, नामवंत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर व राष्ट्रीय समन्वयक सुप्रजा संस्कार (आरोग्य भारती) डॉ. मधुरा कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यशाळेलादेशभरातून १५० पेक्षा जास्त न्यूरोथेरापिस्ट यांची उपस्थिती आहे.
डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी सांगितले की, ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती या तीन शक्तींच्या आधारावर आपण संकल्प केला पाहिजे आणि आपले विचार हे जगासमोर प्रस्तुत केले पाहिजेत. भाऊ तोरस्करउपस्थितांनासंबोधत म्हणाले की, न्यूरोथेरापिस्ट जे सुप्तावस्थेत आहे त्याला कार्यान्वितकरायचं काम करतात. मनाची परिपक्वता ही भोजनापासून ते विचारावर निर्भर असते. ज्यावर उपचार करता त्याला स्वयंभू बनवायचे काम तुम्ही करत आहात. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला विश्वगुरू बनायचे आहे.
डॉ. अशोक कुमार वार्ष्ण्येय यांनी यावेळीसांगितले की प्रत्येक विधा, प्रत्येक शाखा ही एक पूर्ण विज्ञान आहे. केवळ रोगी व्यक्तीला ठीक करायचं एवढाच उद्देश नाही पण त्याच्या आनंदमय कोषापर्यंत पोचायचे हा मुख्य उद्देश आहे. आपण किती ही पुढे गेलो, तरी आपला आधार सोडायचा नाही. एक चिकित्सा पद्धतीची विशेषता सर्व चिकित्सा पद्धतींना माहिती हवी. त्यामुळेच इंटिग्रेशन करू शकतो. आज प्रत्येक स्थानी ट्रेनिंग सेंटर उभे करायची गरज आहे. दुसऱ्यांनाशिकवल तर आपण स्वतः जास्त शिकू शकतो. रिसर्च ओरिएंटेशन - विश्लेषण करणे ही काळाची गरज आहे. अखंड परिश्रम करायची क्षमता असेल तरच तुम्ही आयुष्यात सफल होऊ शकता. सर्वे सन्तुनिरामया: या वाक्यातील भाव जागृत करायची गरज आहे असे ही ते म्हणाले.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक