अजित पवार अनंतात विलीन... अखेरचा निरोप देताना महाराष्ट्र हळहळला

    29-Jan-2026   
Total Views |


ajit pawar

मुंबई : (Ajit Pawar)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी २८ जानेवारीला विमान अपघातात दुःखद निधन झाले. बारामती येथील विद्याप्रतिष्ठान मैदानावर गुरुवारी २९ जानेवारी रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बारामतीकरांसह राज्यातून आलेल्या लाखो कार्यकर्त्यांनी 'अजित दादा परत या...' असा हंबरडा फोडत साश्रू नयनांनी अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला.(Ajit Pawar)

गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्यानंतर हजारो उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली. असा मनमिळाऊ, दिलखुलास, दिलदार नेता परत होणार नाही. अशा अवेळी अजित दादांसारखा उमदा नेता गमावल्याने धक्का बसल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.(Ajit Pawar)

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, राज्य सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या अंत्यदर्शनाला अफाट जनसागर लोटला होता.(Ajit Pawar)

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\