मुंबई : (Ajit Pawar Plane Crash) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. राजकीय क्षेत्रातील तसेच कलाक्षेत्रातूनही भावूक प्रतिक्रिया समोर येत आहेत. "दादा माझे देव आहेत. मी कुठेही गेलो तरी दादांचं माझ्याकडे लक्ष असतं" असं म्हणणारा बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाण याच्यावरही अजित पवारांच्या निधनानंतर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.सूरजने सोशल मीडियावर अजित पवारांचा फोटो शेअर करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने या पोस्टमध्ये 'माझा देव चोरला' अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Ajit Pawar Plane Crash)
माझा देव चोरला!
सूरजने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मित्रांनो माझा देव चोरला आज. मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत…माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांदून दिलं…माझी काळजी घेतली..मला नवीन आयुष्य मिळवून दिलं…माझी काळजी घेतली..मला नवीन आयुष्य मिळवून दिलं…अजितदादांसारखा देव माणूस या जगात नाही…याचं मला लई वाईट वाटतय…लई दुःख होतंय…माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन."(Ajit Pawar Plane Crash)
बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाण आणि अजित पवार यांचं खास नातं होतं. सूरज चव्हाणला त्याच्या डोक्यावर हक्काचं घर बांधून देण्यात त्यांनी मदत केली. सूरजचं घर बांधून देण्यापासून ते पूर्ण झाल्यावर त्याची पाहणी करणं ते त्याच्या हातात घराच्या चाव्या देण्यापर्यंत सगळं अजित दादांनी स्वत: जातीनं पाहिलं होतं. सूरज चव्हाण अजित दादांना देव म्हणतो. दादांनी त्याच्यासाठी जे केलं त्याचे ऋण तो कधीही फेडू शकत नाही असंही त्यानं सांगितलं होतं.(Ajit Pawar Plane Crash)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\