Ajit Pawar Plane Crash : ममता बॅनर्जींच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, "मृत्यूवरही इतकं घाणेरडे राजकारण..."

    28-Jan-2026   
Total Views |

Ajit Pawar

मुंबई : ( Ajit Pawar Plane Crash ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ( Ajit Pawar Plane Crash )

अजित पवार यांच्या निधनानंतर ममता बॅनर्जी यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, "हे अत्यंत दुर्दैवी आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे की, हा एक अपघात होता आणि या अपघातात दुर्दैवाने प्राण गेले आहेत, त्यामुळे या विषयावर राजकारण करू नये. एखाद्याच्या मृत्यूवरही इतके घाणेरडे आणि घृणास्पद राजकारण केले जावे, अशा पातळीवर आपण पोहोचलो आहोत याचे मला मनापासून दुःख वाटते." ( Ajit Pawar Plane Crash )

"ममता बॅनर्जी राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर जात आहेत, हे पाहून मला खूप वाईट वाटले; हे अत्यंत दुर्दैवी आणि पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी असे विधान करायला नको होते. महाराष्ट्रातील एका अत्यंत जवळच्या आणि लाडक्या नेत्याच्या मृत्यूचे अशा प्रकारे राजकारण करून त्यांचा अपमान करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे." ( Ajit Pawar Plane Crash )

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\