मुंबई : (CM Devendra Fadnavis on Ajit Pawar Death) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राज्यभरात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच अजित पवारांच्या जाण्याने दमदार आणि दिलदार मित्र निघून गेला अशी भावूक प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.(CM Devendra Fadnavis on Ajit Pawar Death)
दमदार आणि दिलदार मित्र निघून गेला
"अजित पवार महाराष्ट्रातले लोकनेते होते, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेले नेते होते. अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाचं योगदान ते देत होते, त्याचवेळी त्यांचं निधन झालं ही बाब अविश्वसनीय आहे. माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान झालं आहे. दमदार आणि दिलदार मित्र निघून गेला आहे. पवार कुटुंबावरही हा मोठा आघात आहे. मी आता लवकरच बारामतीमध्ये जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनाही मी घडलेल्या परिस्थितीची कल्पना दिली आहे. या घटनेबाबत त्यांनीही प्रचंड दुःख व्यक्त केलं आहे. संपूर्ण घटनेमुळे राज्यात हळहळ पसरली आहे."(CM Devendra Fadnavis on Ajit Pawar Death)
राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर
"संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. महाराष्ट्रात आज शासकीय सुटी घोषित केली आहे. तसेच तीन दिवसांचा दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कधीही भरुन न निघणारं अशा प्रकारचं नुकसान आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यावर जी पोकळी निर्माण होते ती भरुन काढणं कठीण असतं. इतक्या जवळून, इतक्या संघर्षाच्या काळात आम्ही एकत्र काम केलं आहे. अजित पवार नाहीत या गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही अशी स्थिती आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.(CM Devendra Fadnavis on Ajit Pawar Death)