मुंबई : ( Ajit Pawar Plane Crash ) विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी २९ जानेवारीला त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच बारामती येथे पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे. या दुःखद प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बारामतीत उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.( Ajit Pawar Plane Crash )
पार्थिव अंतिम दर्शनासाठी शारदा प्रांगणात ठेवण्यात येणार
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव प्रथम निवासस्थानी नेण्यात येईल, त्यानंतर ते संध्याकाळपर्यंत अंतिम दर्शनासाठी बारामतीतील शारदा प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघणार असून, त्यानंतर बारामतीतील मिशन हायस्कूल मैदानावर किंवा पवार कुटुंबाच्या शेतावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. देशभरातून आणि राज्यभरातून येणारे नेते, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक येथे त्यांचे अखेरचे दर्शन घेऊ शकणार आहेत. राज्य सरकारने राजकीय शोक जाहीर केला असून, अंत्यसंस्कारावेळी त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन मानवंदना दिली जाईल.( Ajit Pawar Plane Crash )
राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून, या काळात महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो, तिथे तो अर्ध्यापर्यंत खाली ठेवला जाईल. या काळात कोणताही शासकीय करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. तसेच, बुधवार २८ जानेवारी रोजी राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालये बंद राहतील.( Ajit Pawar Plane Crash )
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\