Bhiklya Dhinda : तारपाच्या श्वासातून वारली संस्कृती जिवंत ठेवणाऱ्या भिकल्या धिंडा यांना 'पद्मश्री'

    27-Jan-2026   
Total Views |
Bhiklya Dhinda
 
मुंबई : (Bhiklya Dhinda) आदिवासी संस्कृतीचा आणि वारली कलेचा अविभाज्य भाग असलेल्या 'तारपा' वाद्याला आपल्या श्वासाने जिवंत ठेवणारे, पालघर जिल्ह्याचे सुपुत्र भिकल्या लाडक्या धिंडा (Bhiklya Dhinda) यांना केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा 'पद्मश्री' पुरस्कार नुकताच जाहीर झाला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा होताच पालघर जिल्ह्यात आणि कला विश्वात आनंदाची लाट पसरल्याचे पाहायला मिळाले.(Bhiklya Dhinda)
 
भिकल्या धिंडा (Bhiklya Dhinda) हे पालघर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गेल्या अनेक दशकांपासून ते 'तारपा' या पारंपरिक आदिवासी वाद्याच्या माध्यमातून वारली संस्कृतीची सेवा करत आहेत. त्यांच्या या निस्सीम सेवेची दखल घेत भारत सरकारने त्यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे. भिकल्या धिंडा (Bhiklya Dhinda) यांचे नाव पद्म पुरस्कारांच्या यादीत झळकताच त्यांच्या गावात ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. "हा केवळ भिकल्या (Bhiklya Dhinda) दादांचा सन्मान नसून, हा संपूर्ण आदिवासी संस्कृतीचा आणि कष्टकरी कलाकारांचा सन्मान आहे," अशा भावना स्थानिक कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत.(Bhiklya Dhinda)
 
हेही वाचा : Anjali Bharti : भंडाऱ्यात गायिका अंजली भारतीचं मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य, चित्रा वाघ यांचा संतप्त प्रतिक्रीया! 
 
भिकल्या धिंडा (Bhiklya Dhinda) हे वारली आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर येत त्यांनी आपली कला जोपासली आहे. तारपा हे वाजवण्यासाठी अत्यंत कठीण असे वाद्य मानले जाते, ज्यासाठी प्रचंड दमसासाची (Breath control) गरज असते. भिकल्या धिंडा (Bhiklya Dhinda) हे वयोवृद्ध असूनही आजही तितक्याच ताकदीने आणि तन्मयतेने तारपा वादन करतात. केवळ वादनच नव्हे, तर नवीन पिढीला हे वाद्य शिकवून ही कला लुप्त होऊ नये यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांनी अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय महोत्सवात आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे.(Bhiklya Dhinda)
 
'तारपा' : आदिवासींच्या हृदयाची स्पंदने
 
तारपा हे केवळ एक वाद्य नसून ती वारली समाजाची ओळख आहे. सुकलेला भोपळा, बांबू आणि ताडाच्या पानांपासून हे वाद्य बनवले जाते. दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या आदिवासी नृत्यांमध्ये तारपा वादनाला अनन्यसाधारण महत्त्व असते. भिकल्या धिंडा (Bhiklya Dhinda) यांच्या रूपाने आज याच परंपरेचा गौरव झाला आहे.
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक