मुंबई : (Bangladesh) शुक्रवारी रात्री बांगलादेशातील (Bangladesh) नरसिंगडी येथे २५ वर्षीय हिंदू तरुण चंचल भौमिकची जाळून हत्या करण्यात आली. भौमिक काम झाल्यानंतर गॅरेजमध्येच झोपला होता.(Bangladesh) रात्री अचानक मोठी आग लागल्याने त्याचा मृत्यु झाला. सुरुवातीला हि आग अपघाती वाटत असली तरी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून घातपाताचा संशय निर्माण झाला आहे.(Bangladesh)
मिळालेल्या माहितीनुसार, चंचल हा कामिला जिल्ह्यातील लक्ष्मीपूर गावचा रहिवासी होता. तो नोकरीमुळे नरसिंगडी येथे राहत होता आणि गेल्या सहा वर्षांपासून मस्जिद मार्केटमधील गॅरेजमध्ये काम करत होता. स्थानिक दुकानदार राजीव सरकार यांनी सीसीटीव्ही फुटेजचा अहवाल देत म्हटले की, हा अपघात नव्हता. कॅमेऱ्यात अनेक लोक जाणूनबुजून शटरला आग लावताना दिसत होते. चंचल नेहमी कामावर यायचा आणि कुटुंबातील एकमेव कमावता होता.(Bangladesh)
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, चंचल आगीत अडकला होता आणि बराच वेळ वेदनेने तडफडत होता. त्याने मदतीसाठी ओरड केली, पण शटर बाहेरून बंद होते. त्याला पळून जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता. स्थानिकांच्या सूचना मिळताच अग्निशमन दल पोहोचले आणि आग विझवण्यासाठी सुमारे एक तास लागला.(Bangladesh) तथापि, चंचल पूर्णपणे जळाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.(Bangladesh)
नरसिंगडीचे पोलिस अधीक्षक अब्दुल्ला अल फारुक यांनी सांगितले की, आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज गोळा केले आणि त्यात एक व्यक्ती फिरताना दिसत असल्याचे आढळून आले. आग काही बाह्य कारणामुळे लागली की विजेच्या बिघाडामुळे याचा तपास करत आहोत.(Bangladesh)
हिंदू नेत्यांकडून हत्येचा निषेध
स्थानिक हिंदू समुदायाच्या नेत्यांनी या हत्येचा तीव्र निषेध केला. हे कृत्य क्रूर आणि अमानवीय असल्याचे म्हटले आहे. तसेच अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांना त्वरित अटक करण्याची आणि कठोर कारवाई करण्याची करून परिसरातील अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली.(Bangladesh)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.