New Skywalk At Bandra : वांद्रे (पूर्व) येथील नवीन स्काय वॉक नागरी सेवेसाठी सज्ज

रेल्वे स्थानक ते बीकेसी दरम्यान पादचाऱ्यांना सुरक्षित, जलद आणि सुलभ मार्ग

Total Views |
New Skywalk At Bandra
 
मुंबई : (New Skywalk At Bandra) वांद्रे (पूर्व) परिसरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी नवी स्काय वॉकचे (New Skywalk At Bandra) बांधकाम पूर्ण झाले असून ती नागरी सेवेसाठी सज्ज आहे. वांद्रे न्यायालय, वांद्रे–कुर्ला संकुल, म्हाडा कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांच्या सुरक्षित व सुलभ मार्गक्रमणासाठी ही आकाश मार्गिका अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी या मार्गिकेची प्रत्यक्ष पाहणी केली.(New Skywalk At Bandra)
 
वांद्रे रेल्वे स्थानक (पूर्व) पासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कलानगर जंक्शनपर्यंत उभारण्यात आलेली ही आकाश मार्गिका सुमारे ६८० मीटर लांबीची आणि सरासरी ५.४० मीटर रुंदीची आहे.(New Skywalk At Bandra) पादचाऱ्यांना विविध ठिकाणांहून सहज प्रवेश मिळावा यासाठी चार जिन्यांची सोय करण्यात आली असून, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सुलभ हालचालीसाठी दोन स्वयंचलित सरकत्या जिन्यांची (एस्केलेटर) व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण मार्गिकेवर १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.(New Skywalk At Bandra)
 
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सततची प्रचंड वाहतूक, अनंत काणेकर रस्त्यावरील मोठ्या प्रमाणावरील पादचारी वर्दळ आणि मध्यरात्री उपलब्ध असलेला मर्यादित कालावधी या सर्व आव्हानांवर मात करत हे काम पूर्ण करण्यात आले आहे.(New Skywalk At Bandra) तसेच विविध उपयोगिता वाहिन्यांचे स्थलांतर करताना विशेष तांत्रिक दक्षता घेण्यात आली. स्थापत्य अभियांत्रिकीच्या दृष्टीने अत्यंत कौशल्यपूर्ण आणि आव्हानात्मक असलेले हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आले आहे.(New Skywalk At Bandra)
 
हेही वाचा : Mumbai Metro : मेट्रो लाईन ७ए साठी मोठे यश, अपर वैतरणा जलवाहिनी यशस्वीरीत्या वळवली 
 
यावेळी बोलताना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासकभूषण गगराणी यांनी सांगितले की, वांद्रे रेल्वे स्थानक (पूर्व) ते म्हाडा कार्यालय, वांद्रे न्यायालय, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि बीकेसी परिसरातील कार्यालयांकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी ही आकाश मार्गिका सुरक्षित आणि सोयीची ठरणार आहे. थेट रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाशी जोडणी आणि महामार्ग ओलांडण्यासाठी उपलब्ध सुविधांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर या आकाश मार्गिकेचा वापर करतील. परिणामी अनंत काणेकर रस्त्यावरील गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल.(New Skywalk At Bandra)
 
आकाश मार्गिकेसाठी आवश्यक असलेले संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र, सुरक्षा प्रमाणपत्र तसेच रेल्वे विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले असून ही मार्गिका नागरिकांच्या वापरासाठी लवकरच खुली करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्यावेळी प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते उपस्थित होते.(New Skywalk At Bandra)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.