मुंबई : (Bhojshala Festival Security) मध्य प्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशालेत वसंत पंचमी आणि जुम्म्याची नमाज एकाच दिवशी आल्याने पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हिंदूंनी वसंत पंचमी साजरी केली.(Bhojshala Festival Security) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दुपारी १ वाजेपर्यंत हिंदूंना पूजा करण्याची परवानगी देण्यात आली होती. तर दुपारी १ ते ३ या वेळेत मुस्लिमांना नमाज अदा करण्यासाठी वेळ देण्यात आली होती.(Bhojshala Festival Security)
यावेळी कडक सुरक्षेत देवी सरस्वतीची पूजा करून प्रार्थना करण्यात आली.(Bhojshala Festival Security) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत देवी सरस्वतीच्या मुर्तीसमोर पूजा आणि हवन सुरू होते. सायंकाळी पूर्णाहुती देऊन पंचमीची सांगता झाली. देवीची पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला आल्या होत्या. यावेळी केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांनीही भोजशाळेत येऊन सरस्वती देवीचे दर्शन घेतले.(Bhojshala Festival Security)
गेली अनेक दशके हिंदू समाज भोजशालेत वसंत पंचमी साजरी करतो. मात्र, ज्यावेळी वसंत पंचमीला शुक्रवार येतो तेव्हा तणाव निर्माण होतो. २०१३ आणि २०१६ रोजी शुक्रवार आल्याने तणाव निर्माण झाला होता. तसेच यावेळी शुक्रवार आल्याने तणाव निर्माण होण्याची भीती होती. परंतु पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केल्याने दोन्ही धर्मियांचे कार्यक्रम शांततेत पार पडले.(Bhojshala Festival Security)
वसंत पंचमीच्या दिवशी धार शहराचे पोलिस छावणीत रूपांतर झाले.(Bhojshala Festival Security) भोजशाळेकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांचा पहारा होता आणि बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. आकाशात ड्रोन उडत होते. छतापासून रस्त्यांपर्यंत कडक पाळत ठेवण्यात आली होती.(Bhojshala Festival Security)
हिंदू समाजाला हिंदूंच्याच देशात सण साजरे करण्यासाठी सुरक्षा घ्यावी लागत असेल तर याहून दुर्दैवाची गोष्ट दुसरी नाही.(Bhojshala Festival Security) भोजशालेत गेली हजारो वर्ष हिंदू भाविक वसंत पंचमी साजरी करत आहेत. परंतु शुक्रवार आला तर हिंदूंना सुरक्षेसाठी सुप्रीम कोर्टाची पायरी चढावी लागते. हिंदू समाजाने हिंदुस्थानात सण साजरे करायचे नाहीत तर कुठे करायचे?(Bhojshala Festival Security)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.