मुंबई : (Borivali Solar Inauguration) नाना पालकर स्मृती समिती, बोरीवली शाखा आणि श्री मोरेश्वर सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने व विधानपरिषद सदस्य मा. आ. श्रीकांत भारतीय यांच्या सौजन्याने ‘मनोमय कक्ष’ तसेच १९ किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. बोरीवली येथील बाभई संकुलात या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रामकृष्ण मिशन मुंबईचे उपाध्यक्ष मा. श्री. कुलभूषण स्वामीजी उपस्थित होते.(Borivali Solar Inauguration)
यावेळी स्वामीजी म्हणाले की, आज येथे सुरू असलेले विविध सेवा कार्य पाहून मनापासून आनंद वाटतो. येथे आरोग्य क्षेत्राच्या अनेक पातळ्यांवर काम सुरू आहे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा भाव आपल्याला आपल्या उच्च आदर्शांनी मिळाला आहे. आपले कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘अंत्योदय’ संकल्पनेसारखे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे.(Borivali Solar Inauguration)
यावेळी बोरीवली विधानसभेचे आमदार संजय उपाध्याय म्हणाले की, या भागात आधी ऊर्जा होती, आता सौरऊर्जा आली.(Borivali Solar Inauguration) या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून उत्तम आणि दिशादर्शक काम सुरू आहे. आम्ही प्रतिनिधी म्हणून मदत करत असलो तरी अजून काही फार मोठे केले आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र भविष्यात हे कार्य निश्चितच अधिक व्यापक आणि प्रभावी करायचे आहे.(Borivali Solar Inauguration)
विधानपरिषद सदस्य मा. आ. श्रीकांत भारतीय म्हणाले की, आमचा निधी हा आमदारांचा निधी नाही. तो सामान्य माणसांच्या कष्टाच्या पैशांतून उभा राहिलेला निधी आहे.(Borivali Solar Inauguration) त्यामुळेच या निधीवर पहिला हक्क जनतेचा आहे आणि तो जनहितासाठीच वापरला गेला पाहिजे. आजची जेन झी आणि अल्फा पिढी ही मानसिक, भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या मोठ्या बदलाच्या टप्प्यावर आहे. त्यांच्यासाठी मनोमय कक्ष एक वरदान ठरणार आहे.(Borivali Solar Inauguration)
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक तथा नाना पालकर स्मृती समितीचे पालक शरदभाऊ खाडीलकर, नाना पालकर स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ. अमेय देसाई, श्री मोरेश्वर सेवा संघाचे अध्यक्ष नरेंद्र घनवटकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेधा जोशी यांनी केले.(Borivali Solar Inauguration)
संत तुकाराम महाराजांनी फार पूर्वीच सांगून ठेवले आहे की, मनाशी संवाद केला पाहीजे. म्हणजेच इथल्या तरूणांनी आत्मपरीक्षण करायला हवे.(Borivali Solar Inauguration) मुलांना कधी कधी एकांतात स्वतःशीच संवाद साधयला लावता यायला हवा. हा संवाद नकारात्मक न ठरता योग्य दिशेने जावा यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे. हेच कार्य मनोमय कक्षाच्या माध्यमातून पूर्तीस जाईल.(Borivali Solar Inauguration)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.