मुंबई : ( Chhagan Bhujbal ) राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण सुरु असून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भुजबळ यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.
याआधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) मंत्री छगन भुजबळ यांना क्लिनचिट देण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीकडूनही त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांच्यासोबतच त्यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांच्यासह इतरांचीही या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात छगन भुजबळ यांच्यावर आरोप झाले होते. त्यावेळी छगन भुजबळ महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्यावर नियमांचे उल्लंघन करून नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचे कंत्राट एका खाजगी कंपनीला दिल्याचा आणि त्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप होता. या प्रकरणात ते दोन वर्ष तुरुंगातही होते. दरम्यान, आता त्यांना याप्रकरणात क्लिनचिट मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....