Central Railway Mumbai Division : मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीला नवे बळ

बॉक्साईट व अकेशिया पल्प लोडिंगची यशस्वी सुरुवात

Total Views |


मुंबई : (Central Railway Mumbai Division) मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने (Central Railway Mumbai Division) बॉक्साईट आणि आयातीत ब्लीच्ड हार्डवुड क्राफ्ट पल्प (अकेशिया) या दोन नव्या मालप्रकारांच्या लोडिंगला सुरुवात करून आपल्या मालवाहतूक सेवांचा महत्त्वपूर्ण विस्तार केला आहे. या निर्णयामुळे विभागाच्या मालवाहतूक क्षमतेत वाढ होण्यासोबतच महसूल निर्मितीला लक्षणीय चालना मिळणार आहे. सध्या मुंबई विभागाच्या एकूण महसुलापैकी सुमारे ३३ टक्के हिस्सा मालवाहतूक महसुलाचा आहे.(Central Railway Mumbai Division) 

उरण गुड्स शेड येथून बॉक्साईट लोडिंगचा शुभारंभ करण्यात आला असून, दि.१९ जानेवारी २०२६ रोजी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडकडून पहिला रेक यशस्वीरीत्या लोड करण्यात आला. हा रेक दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत मलखेड येथील राजश्री सिमेंट वर्क्स कडे रवाना करण्यात आला. या एका रेकमधूनच सुमारे ५२.३८ लाख रुपयांचा मालवाहतूक महसूल मिळाला असून, येत्या काळात उरण गुड्स शेडवरून दरमहा २ ते ३ रेक लोड होण्याची शक्यता आहे.(Central Railway Mumbai Division)

नुकतेच कार्यान्वित झालेल्या उरण गुड्स शेडने अल्पावधीतच आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. नोव्हेंबर २०२४ पासून येथे आतापर्यंत कार्बन ब्लॅक फीड स्टॉकचे २१ रेक लोड करण्यात आले असून, सिमेंट व क्लिंकरचेही २१ रेक अनलोड करण्यात आले आहेत. बॉक्साईटचा वापर पर्यावरणपूरक आणि अधिक मजबूत सिमेंट निर्मितीसाठी केला जातो. औद्योगिक अवशेषांचा उपयोग आणि क्लिंकर उत्पादनातील CO₂ उत्सर्जन कमी करण्यासाठी हा महत्त्वाचा घटक मानला जातो.(Central Railway Mumbai Division)
 
हेही वाचा : ST : 'एसटी संगे तीर्थाटन’ योजनेचा शुभारंभ,

यासोबतच मुंबई विभागाने (Central Railway Mumbai Division) आणखी एका नव्या मालप्रकाराचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. ब्राझीलमधून आयात करण्यात आलेल्या ब्लीच्ड हार्डवुड क्राफ्ट पल्प (अकेशिया)च्या लोडिंगला दि.२० जानेवारी २०२६ रोजी सुरुवात झाली. मुंबई पोर्ट ट्रस्ट येथून हा माल डीपी वर्ल्ड रेल लॉजिस्टिक्स प्रा. लि. (पीएमकेएम) येथे १,४८८ किलोमीटर अंतरासाठी रवाना करण्यात आला असून, यामुळे सुमारे ३७.७९ लाख रुपयांची अतिरिक्त महसूलवाढ झाली आहे.

मालवाहतूक क्षेत्रातील ही प्रगती आकडेवारीतही स्पष्ट दिसून येते. आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये मुंबई विभागाने (Central Railway Mumbai Division) १७.०७ दशलक्ष टन मालवाहतूक लोडिंगची नोंद केली असून, मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ आहे. विशेष म्हणजे एनएमजी (न्यू मॉडिफाइड गुड्स) रेक लोडिंगमध्ये ३५० टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली आहे. डिसेंबर २०२५ महिन्यातच १.९३ दशलक्ष टन मालवाहतूक झाली असून, दररोज सरासरी १,५३८ वॅगन लोड करण्यात आले.(Central Railway Mumbai Division)

बॉक्साईट आणि अकेशिया पल्पसारख्या नव्या मालप्रकारांचा समावेश ही केवळ वाहतूक वाढ नव्हे, तर उद्योग, पर्यावरण आणि महसूल यांचा समतोल साधणारी पावले आहेत.(Central Railway Mumbai Division) मालवाहतूक वाढवण्याच्या दिशेने मध्य रेल्वेची ही वाटचाल भविष्यात अधिक मजबूत आणि परिणामकारक ठरणार आहे.(Central Railway Mumbai Division)


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.