मुंबई : (Goregaon Mulund Flyover) मुंबईतील पूर्व–पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक जलद, सोपा आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले जात आहे. गोरेगाव–मुलुंड जोड मार्ग (Goregaon Mulund Flyover) प्रकल्पांतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारण्यात येणारा उड्डाणपूल वेगाने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्दिष्ट दि.३१ मे २०२६ पर्यंत हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्याचे आहे.(Goregaon Mulund Flyover)
या उड्डाणपुलासाठी (Goregaon Mulund Flyover) प्रस्तावित एकूण ३१ खांबांपैकी ३० खांबांची उभारणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, एकूण काम सुमारे ७५ टक्के पूर्ण झाले आहे. आतापर्यंत ३० पैकी १७ स्पॅनचे काम पूर्ण झाले असून उर्वरित स्पॅनचे कामही वेगात सुरू आहे.(Goregaon Mulund Flyover) दोन्ही बाजूंचे पोहोच मार्ग, संरचनात्मक व स्थापत्य कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार प्रगतिपथावर आहेत.(Goregaon Mulund Flyover)
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दि.२२ जानेवारी रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाचा आढावा घेतला.(Goregaon Mulund Flyover) पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. हा उड्डाणपूल दिंडोशी न्यायालयापासून सुरू होऊन रत्नागिरी जंक्शन हॉटेलजवळ ९० अंश वळण घेत दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उतरतो. गोरेगाव व मुलुंड अशा दोन टप्प्यांत पुलाची उभारणी करण्यात येत आहे.(Goregaon Mulund Flyover)
१२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव–मुलुंड जोड मार्ग (Goregaon Mulund Flyover) हा मुंबईतील चौथा महत्त्वाचा पूर्व–पश्चिम दुवा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे गोरेगाव ते मुलुंड प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवरून थेट २५ मिनिटांपर्यंत कमी होणार असून, उत्तर मुंबईतील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळणार आहे.(Goregaon Mulund Flyover) इंधनाची बचत, प्रदूषणात घट आणि वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा हे याचे अतिरिक्त फायदे असतील. हा प्रकल्प केवळ रस्ता नसून, मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात वेळ, इंधन आणि तणाव वाचवणारा विकासाचा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. लवकरच खुला होणारा हा उड्डाणपूल मुंबईच्या गतिमान शहरजीवनाला नवी गती देणार आहे.(Goregaon Mulund Flyover)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.